"तुम्ही दूध मागितलं तर आम्ही खीर देऊ पण बंगाल मागितला तर तुम्हाला चिरुन टाकू" 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 01:05 PM2021-01-31T13:05:27+5:302021-01-31T13:18:24+5:30

TMC Madan Mitra And BJP : पश्चिम बंगालमधील एका सभेत तृणमूल काँग्रेसचे नेते मदन मित्रा यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

doodh maango to kheer denge, agar Bengal maango toh chiir denge says TMC Madan Mitra | "तुम्ही दूध मागितलं तर आम्ही खीर देऊ पण बंगाल मागितला तर तुम्हाला चिरुन टाकू" 

"तुम्ही दूध मागितलं तर आम्ही खीर देऊ पण बंगाल मागितला तर तुम्हाला चिरुन टाकू" 

Next

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) पाच नेत्यांनी शनिवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत नेते भाजपामध्ये दाखल झाले आहेत. याच दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने भाजपावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमधील एका सभेत तृणमूल काँग्रेसचे नेते मदन मित्रा (Madan Mitra) यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "तुम्ही दूध मागितलं तर आम्ही खीर देऊ पण बंगाल मागितला तर तुम्हाला चिरुन टाकू" असं म्हणत भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर 24 परगाना जिल्ह्यात एका राजकीय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भरसभेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने भाजपाला थेट धमकी दिली आहे. "मी सकाळी बैठकीला उपस्थित असेन आणि रात्री मसाले (शस्त्र) घेऊन येईन. तो मसाला काय आहे हे मी सांगणार नाही. पण ज्या मसाल्याचा उपयोग तुम्ही करता आम्ही पण तोच मसाला वापरणार आहोत. तुम्ही दूध मागितलं तर आम्ही खीर देऊ पण बंगाल मागितला तर तुम्हाला चिरुन टाकू" अशी धमकी मदन मित्रा यांनी दिली आहे. 

मदन मित्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे. मोदी या शब्दाचा अर्थ "लोकशाहीची हत्या" असा होतो असं देखील त्यांनी या सभेत सांगितलं आहे. मोदींना हवं असेल तर त्यांनी माझ्यावर खटला दाखल करावा असं आव्हान मित्रा यांनी यावेळी दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर ममता बॅनर्जींनी निशाणा साधला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत ममता यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. 

"बहुमत तुम्हाला लोकांना मारण्याची परवानगी देत नाही", ममता बॅनर्जी संतापल्या

केंद्र सरकारकडून आपल्याकडे बहुमत आहे आणि कृषी कायदे संसदेत मंजूर करण्यात आले आहेत असं सांगितलं जात आहे. यावर प्रश्न विचारला असता ममता बॅनर्जी यांनी "बहुमत तुम्हाला लोकांना मारण्याची परवानगी देत नाही" असं म्हणतं मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ममता बॅनर्जी यांनी "बहुमत तुम्हाला लोकांना मारण्याची परवानगी देतं नाही. कृषी कायदे घाईत गडबडीत आणले गेले आहेत. कोरोना काळात आवाजी मतदानानं हे कायदे मंजूर करण्यात आले आहेत. मी केंद्र सरकारला विनंती करते की कृषी कायदे रद्द करावेत" असं म्हटलं आहे. तसेच माझे पंजाबमधील भाऊ आणि बहिणी एकजूट झाले आहेत. देशाच्या इतर भागातही हेच दिसत आहे. उद्धव ठाकरे, एम. के. स्टॅलिन आणि अरविंद केजरीवाल काय म्हणत आहे बघा. आम्ही सर्वजण एकजूट आहोत" असं देखील ममता यांनी म्हटलं आहे. 

"बँड-बाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी-टीम म्हणणं सुरू केलंय", ओवैसींचा काँग्रेसवर हल्लाबोल

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच टीएमसीवर देखील निशाणा साधला आहे. "बँड-बाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी-टीम म्हणणं सुरू केलंय" असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.  "पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं आम्ही जाहीर केल्यानंतर, एकेकाळी काँग्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँड-बाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी टीम म्हणणं सुरू केलं आहे. ममता बॅनर्जी देखील असंच म्हणत आहेत. मी एकमेव आहे ज्याच्याविषयी ते बोलू शकतात? मी कोणाचाही नाही पण जनतेचा आहे" असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तसेच आगामी निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी याआधी जाहीर केलं आहे.

"मी गळा कापून घेणं पसंत करेन पण भाजपासमोर झुकणार नाही", ममता बॅनर्जी कडाडल्या 

"मी गळा कापून घेणं पसंत करेन पण भाजपासमोर झुकणार नाही" असं म्हणत ममता यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. हुगळी येथे एका जनसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर त्या लोकांनी माझा अपमान केला आहे. मी बंदुकीच्या गोळीवर विश्वास ठेवत नाही तर मी राजकारणावर विश्वास ठेवते. भाजपाने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बंगालचा अपमान केला आहे. या कार्यक्रमात जर तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने घोषणा दिल्या असत्या तर मी तुम्हाला सलाम केला असता. पण तुम्ही जर मला बंदुकीच्या नळीसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर अशावेळी प्रतिहल्ला कसा करायचा हे मला चांगलच माहीत आहे. त्या दिवशी त्यांनी बंगालचा अपमान केला आहे" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. 

Web Title: doodh maango to kheer denge, agar Bengal maango toh chiir denge says TMC Madan Mitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.