"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 11:32 AM2024-10-02T11:32:09+5:302024-10-02T11:36:03+5:30

समरजित सिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये ते कागल गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला होता.

"Due to Shiv Sena I lost in assembly elections", Samarjit Singh Ghatge's big statement | "शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान

"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान

Maharashtra Election 2024: भाजपामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या समरजित सिंह घाटगे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीबद्दल एक मोठे विधान केले. २०१९ मध्ये समरजित सिंह घाटगे अपक्ष लढले होते, पण त्यांचा पराभव झाला. त्या पराभव घाटगेंनी एका मुलाखतीत बोलताना भूमिका मांडली. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत तु्म्हाला भाजपाने अपक्ष निवडणूक लढवायला सांगितलं होतं का? या प्रश्नाला उत्तर देताना समजरजित सिंह राजे घाडगे यांनी मुंबई तक युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले. 

फडणवीसांनी अपक्ष लढायला सांगितलं होतं का?

समरजित सिंह घाटगे म्हणाले, "त्या काळात देवेंद्रजींनी एक यात्रा काढली होती. त्या यात्रेत त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर जेव्हा त्या गोष्टी झाल्या नाहीत, अंतर्गत विषय काही असो. मला उभे करून शिवसेनेला पाडायचं असतं, तर आकडे बघितले तर मी तीन नंबरवर असायला पाहिजे होतं."

"शिवसेनेला मी पाडलं नाही, शिवसेनेमुळे माझा पराभव झाला. मला ९० हजार मते मिळाली, शिवसेनेला ५० हजार मते मिळाली होती. मुश्रीफांना एक लाख ६० हजार मते मिळाली. त्यामुळे माझा पराभव शिवसेनेच्या उमेदवारामुळे झाला. शिवसेनेचा उमेदवार नसता तर मी आलो (जिंकलो) असतो", असे समरजित सिंह घाटगे म्हणाले. 

समरजित सिंह घाटगेंचा किरीट सोमय्यांना टोला 

हसन मुश्रीफांवर किरीट सोमय्यांनी मनी लॉड्रिंगचे आरोप केले. पण, हसन मुश्रीफ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि महायुतीत कॅबिनेट मंत्री बनले. त्यानंतर किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांबद्दल थांबवलं. 

त्यांच्या मौनावर समरजित घाटगे म्हणाले, "मी केलेले आरोप सोडत नाही. मी केलेले आरोप... ते (हसन मुश्रीफ) ते महायुतीत आले, तरी ती केस मी चालू ठेवली. कुणी वरून कितीही सपोर्ट केला, तरी मी केस लढणार आहे", असे ते म्हणाले.  

Web Title: "Due to Shiv Sena I lost in assembly elections", Samarjit Singh Ghatge's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.