"राऊतजी, कंगना कार्यालयात नसताना कारवाई करण्यात कोणती मर्दानगी होती?"

By कुणाल गवाणकर | Published: November 24, 2020 01:56 PM2020-11-24T13:56:58+5:302020-11-24T18:13:56+5:30

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे; भाजप, महाविकास आघाडीत जुंपली

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik bjp leader pravin darekar questions mp sanjay raut | "राऊतजी, कंगना कार्यालयात नसताना कारवाई करण्यात कोणती मर्दानगी होती?"

"राऊतजी, कंगना कार्यालयात नसताना कारवाई करण्यात कोणती मर्दानगी होती?"

Next

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. सरनाईक सध्या परदेशात असल्याची माहिती मिळत आहे. ईडीनं आपल्याला कोणतीही नोटीस दिली नव्हती. त्यांनी थेट घर आणि कार्यालयांवर धाड टाकल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीनं ताब्यात घेतलं असून धाडसत्र सुरूच आहे. 

'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द'

सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीनं छापे टाकल्यानंतर राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. केंद्राकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप सरकारमधील नेत्यांनी केला. यानंतर आता भाजप नेत्यांशी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.

मोठी बातमी! प्रताप सरनाईकांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात

आमदार प्रताप सरनाईक घरी नसताना धाडी टाकण्यात कसली मर्दानगी?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्यावर अभिनेत्री कंगना राणौत कार्यालयात नसताना, ती मुंबईबाहेर असताना तिचं कार्यालय बुलडोझर लावून पाडण्यात कोणती मर्दानगी होती?, असा प्रतिसवाल दरेकरांनी केला आहे. मर्दानगीच्या व्याख्या सोयीनुसार बदलतात का?, असा खोचक प्रश्नदेखील त्यांनी राऊत यांना विचारला.

'मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती, पण...'; प्रताप सरनाईकांनी दिली प्रतिक्रिया




ईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देतो. ईडीनं त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. राऊतांच्या या आव्हानाला दरेकरांना प्रतिआव्हान दिलं आहे. 'इतका वेळ १०० जणांची यादी राऊत यांनी कशासाठी स्वत: जवळ ठेवली? त्यांनी ती यादी लगेच ईडीला द्यावी. ईडी स्वायत्त यंत्रणा आहे. त्यामुळे राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून उगाच मोदी सरकारवर टीका करू नये,' असं दरेकर म्हणाले.

...म्हणून ईडीच्या कारवाईचं स्वागत; सोमय्यांचा पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर बाण

आम्हाला कोणाच्या बापाला घाबरत नाही; संजय राऊत आक्रमक
कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका त्यांनी केली.




शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचं पथक; सेनेचे इतरही नेते रडारवर?

प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.

Web Title: ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik bjp leader pravin darekar questions mp sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.