एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल; क्वारंटाईननंतर आला विकनेस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 11:16 AM2021-01-15T11:16:18+5:302021-01-15T11:31:05+5:30
Eknath Khadse Ed News: ईडीने खडसे यांना ३० डिसेंबरला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविले. मात्र, त्यांना कोरोनासदृश आजाराची लागण झाली. त्यामुळे त्यांना १४ दिवसांनंतर चौकशीस बाेलावण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई : भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. क्वारंटाईन संपल्यानंतर खडसे ईडीच्या कार्यालयात नुकतेच दाखल झाले असून ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.
ईडीने खडसे यांना ३० डिसेंबरला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविले. मात्र, त्यांना कोरोनासदृश आजाराची लागण झाली. त्यामुळे त्यांना १४ दिवसांनंतर चौकशीस बाेलावण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे समन्स बजाविले. यानुसार ते आज ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत.
निवासस्थानातून निघताना खडसे यांनी सांगितले की, थोडा विकनेस जाणवत आहे. ईडीने बोलावले आहे. त्यांना मी सर्व कागदपत्रे सादर करणार आहे. सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे.