Maharashtra Floods: “मोठा भाऊ म्हणून आता जबाबदारी घ्या, भेदभाव न करता भरीव मदत द्या”: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 11:43 AM2021-07-31T11:43:14+5:302021-07-31T11:45:36+5:30

Maharashtra Floods: पॅकेज जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

eknath shinde says centre govt should give big aid for flood affected maharashtra | Maharashtra Floods: “मोठा भाऊ म्हणून आता जबाबदारी घ्या, भेदभाव न करता भरीव मदत द्या”: एकनाथ शिंदे

Maharashtra Floods: “मोठा भाऊ म्हणून आता जबाबदारी घ्या, भेदभाव न करता भरीव मदत द्या”: एकनाथ शिंदे

Next
ठळक मुद्देमोठा भाऊ म्हणून आता केंद्राने जबाबदारी घ्यायला हवीकेंद्र आणि राज्य भेदभाव न करता भरीव मदत द्याएकनाथ शिंदे यांचे केंद्र सरकारला आवाहन

पुणे: कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील अन्य परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढल्यानंतर या भागांचे पाहणी दौरे करण्यासाठी नेतेमंडळी सरसावली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी मदतकार्याचा आढावा घेतला. पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मोठा भाऊ म्हणून आता केंद्राने जबाबदारी घ्यायला हवी. केंद्राने दिलेली मदत तुटपुंजी असून, केंद्र आणि राज्य भेदभाव न करता भरीव मदत द्या, असे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. (eknath shinde says centre govt should give big aid for flood affected Maharashtra)

कोकणात महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे कँम्प राबवले जातायत. राज्य सरकारने पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफ निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत आहे. पंचनामे झाल्यावर येत्या दोन दिवसात पॅकेज जाहीर केले जाईल. पॅकेज जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

“GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील”

शिवसेनेची आरोग्य शिबिरे सुरू

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे मोफत फिरता दवाखाना शिरोळ तालुक्यातील नरसोबाची वाडी, जैनापूर येथे दाखल झाला असून आरोग्य शिबिरांना सुरुवात झाली आहे. रुग्ण सेवा देणाऱ्या मोबाईल व्हॅनमधून शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयांमध्ये असणाऱ्या पूर बाधितांची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांना आवश्यक ती औषधे पुरवण्यात आली आहेत. या ठिकाणी जवळपास २५० पूर बाधितांनी या सेवेचा लाभ घेतला, अशी माहिती यावेळी देण्यात आली. टीव्ही ९ शी बोलताना एकनाथ शिंदे यांनी केंद्राला आवाहन केले आहे. 

आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती!

दरम्यान, मी पॅकेज देणारा नव्हे तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे महापुराच्या अस्मानी संकटात कोणत्याही सवंग घोषणा करणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर-सांगलीतील अनेक लोकांच्या घरातील पूराचे पाणी अजून ओसरलेले नाही. आता कुठे स्थानिक सावरत आहेत. त्यामुळे नुकसानीचा नेमका अंदाज आलेला नसल्याने मदतीची घोषणा केलेली नाही. तातडीची मदत म्हणून १० हजार रुपये देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिरोळ व कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागांस भेट देवून त्यांनी पूरग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या.
 

Web Title: eknath shinde says centre govt should give big aid for flood affected maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.