UP Election 2022: “योगी आदित्यनाथ माझ्यावर जातीयवादाचा आरोप करतात, पण...”; अखिलेश यादवांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 09:11 AM2022-01-11T09:11:26+5:302022-01-11T09:12:25+5:30

UP Election 2022: समाजवादी पक्ष पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करेल, असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला आहे.

up election 2022 akhilesh yadav criticised bjp and yogi adityanath over various issues | UP Election 2022: “योगी आदित्यनाथ माझ्यावर जातीयवादाचा आरोप करतात, पण...”; अखिलेश यादवांचा पलटवार

UP Election 2022: “योगी आदित्यनाथ माझ्यावर जातीयवादाचा आरोप करतात, पण...”; अखिलेश यादवांचा पलटवार

Next

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचा (UP Election 2022) कार्यक्रम जाहीर झाला असून, सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यातच आता सर्व पक्षांनी कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचार आणि रॅलीला घातलेल्या बंदीमुळे सर्वच पक्षांची अडचण वाढल्याचे सांगितले जात आहे. अशातच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये आताच्या घडीला योगी आदित्यनाथ यांच्या जातीचे वर्चस्व दिसत असून, त्यांचेच राज्य सुरू असल्याचे वाटते. योगी जातीयवादाचे राजकारण करतात आरोप मात्र माझ्यावर लावतात, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्ष पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

समाजवादी पक्षाचे सरकार येईल

उत्तर प्रदेशमध्ये असलेला पैसा योगी सरकारने संपवला. सरकारी तिजोऱ्या खाली केल्या. उत्तर प्रदेशमध्ये किती वीज उत्पादन प्रकल्प सुरू केले, याचा आकडा मुख्यमंत्र्यांनी सांगावा. भाजप खोटे बोलत आहे. निवडणुकीवेळी दिलेल्या संकल्पपत्राविषयी भाजपवाले मौन बाळगून आहेत. उत्तर प्रदेशमध्ये महागाई गगनाला भिडली आहे. आता प्रदेशातील जनता समाजवादी पक्षाचे सशक्त पर्याय म्हणून पाहात असून, जनतेच्या पाठिंब्यावर आम्ही सरकार स्थापन करू, असे अखिलेश यादव म्हणाले. 

दरम्यान, या निवडणुकीत भाजपला ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तरी खूप झाले. भाजपला जनतेचा कौल मिळणार नाही. अखिलेश यादव मुख्यमंत्री होतील. भाजपवाले भ्रमात आहेत. हिंदू-हिंदू करणारे नकली हिंदू आहेत. व्यापारीही भाजपवाल्यांना कंटाळले आहेत, असे सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी सांगितले. यंदाची निवडणूक अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत लढणार असल्याचे राजभर यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: up election 2022 akhilesh yadav criticised bjp and yogi adityanath over various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.