UP Election 2022: “ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 01:37 PM2021-07-28T13:37:26+5:302021-07-28T13:44:39+5:30
UP Election 2022: भाजप नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी एमआयएमचे असदुद्दीने ओवेसी यांच्यावर टीका करत, त्यांना सभ्य माणूस समजत होते, असे म्हटले आहे.
लखनऊ: येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सर्वांत आघाडीवर भाजप असल्याचे दिसत असून, भाजपला पराभूत करण्यासाठी काही पक्षांनी एकत्र आले आहेत. यातच आता भाजप नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी एमआयएमचे असदुद्दीने ओवेसी यांच्यावर टीका करत, त्यांना सभ्य माणूस समजत होते, असे म्हटले आहे. (up election 2022 uma bharti criticised asaduddin owaisi over politics in uttar pradesh)
उमा भारती म्हणाल्या की, अँटी मजनू स्क्वॉड आठवतंय का, यासंदर्भात ओवेसी यांची बोलती बंद व्हायची. असदुद्दीन ओवेसी यांना एक सभ्य व्यक्ती समजत होते. मात्र, यापुढे उत्तर प्रदेशात असं काही खपवून घेणार नाही, असा इशाराच उमा भारती यांनी दिला आहे. ओवेसी यांनी अलीकडेच म्हटले होते की, उत्तर प्रदेशात लैला बनल्यासारखे वाटत आहे. कारण, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मजनूसारखे त्यांची आठवण काढत असतात. यासंदर्भात उमा भारती यांनी ओवेसींना सुनावले आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
मायावती स्वतः बाहेर फिरून चर्चा करत नाही
मायावती यांनी उत्तर प्रदेशात ब्राह्मण संमेलन आयोजित करण्यावरूनही उमा भारती यांनी टीका केली आहे. मायावती स्वतः बाहेर पडत नाही आणि ब्राह्मण संमेलने घेत आहेत. हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. राम मंदिर मुद्द्यावरूनही उमा भारती यांनी सतीश मिश्रा यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी जातीने अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित होते. रामलल्लाला त्यांनी साष्टांग दंडवतही घातला. भव्य राम मंदिर होणार यात कोणतेच दुमत नाही. पण, हेच बसपवाले राम मंदिराच्या जागी शौचालय बांधण्याची तयारी करत होते, असा हल्लाबोल उमा भारती यांनी केला.
लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा
भाजपच्या जागा नक्कीच वाढतील
मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशमध्ये नक्कीच जास्त जागा मिळतील. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनात आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात लढल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळेल, असा विश्वास उमा भारती यांनी यावेळी व्यक्त केला.