महाराष्ट्रातला निवडणूक फॅक्टर : रिंगणात उतरले पाच डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 06:57 PM2019-04-05T18:57:00+5:302019-04-05T18:58:53+5:30
देशात सगळीकडे निवडणुकांची हवा असताना महाराष्ट्रात मात्र सहा डॉक्टर रिंगणात असल्याचे दिसून आले आहे. लोकांच्या जवळ जाण्याचा व्यवसाय असणाऱ्या या डॉक्टरांनी राजकारणाची वाट जोपासली असून काहींना यापूर्वी यशही मिळाले आहे.
पुणे : देशात सगळीकडे निवडणुकांची हवा असताना महाराष्ट्रात मात्र सहा डॉक्टर रिंगणात असल्याचे दिसून आले आहे. लोकांच्या जवळ जाण्याचा व्यवसाय असणाऱ्या या डॉक्टरांनी राजकारणाची वाट जोपासली असून काहींना यापूर्वी यशही मिळाले आहे. त्यामुळे यंदा त्यांच्या प्रचाररूपी उपचारांना मतदार कसा प्रतिसाद देतात हे २३ मे'ला स्पष्ट होईल. चला तर बघूया कोण आहेत हे डॉक्टर
डॉ सुभाष भामरे : धुळ्याचे माजी खासदार असणारे भामरे हे संरक्षण खात्यात राज्यमंत्री होते. व्यवसायाने ते कर्करोग तज्ज्ञ असून त्यांनी प्रसिद्ध जे जे हॉस्पिटल आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम केले आहे. ते भाजपमध्ये कार्यरत आहेत.
डॉ हिना गावित : यादेखील भाजपमध्ये कार्यरत असून नंदुरबारमधून लोकसभेच्या सदस्य आहेत. त्या १६ व्य लोकसभेत सर्वात कमी वयात अर्थात अवघ्या २६व्या वर्षी खासदार होत्या.
डॉ. प्रितम मुंडे : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या प्रीतम या त्वचारोग तज्ज्ञ आहेत. वडिलांचे निधन झाल्यावर त्या बीडमधून ६ लाखांपेक्षाही अधिक मताधिक्याने निवडून आल्या होत्या. यंदाही त्या आपले नशीब अजमावत आहेत.
डॉ अमोल कोल्हे : एमबीएसएसपर्यंत शिक्षण घेतलेले डॉ कोल्हे हे शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर उभे आहेत. ते फक्त डॉक्टर नाहीत तर अभिनेतेदेखील असून त्यांच्या ऐतिहासिक भूमिका विशेष गाजल्या आहेत.