राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकांमधील पराभवाला अंतर्गत धूसफूसच कारणीभूत : सुप्रिया सुळे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 07:03 PM2019-03-09T19:03:04+5:302019-03-09T19:04:59+5:30

लवकरच राज्य सरकारच्या खोट्या जाहिरातींचा पदार्फाश करणार आहे...

election loss results due to causes in NCP's : Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकांमधील पराभवाला अंतर्गत धूसफूसच कारणीभूत : सुप्रिया सुळे 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकांमधील पराभवाला अंतर्गत धूसफूसच कारणीभूत : सुप्रिया सुळे 

Next
ठळक मुद्देआघाडी सरकार सत्तेवर आले तर सरसकट कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव देणार

पुणे (भुलेश्वर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तसे कोणीही रोखु शकत नाही. पण मागील ताही निवडणुकांमध्ये पक्षाच्या पराभवाला फक्त फक्त अंतर्गत धुसफुसच हे एकमेव कारण आहे. आणि याचा फटका पक्षाला मोठ्या प्रमाणावर सहव करावा लागला आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील पिंपरी येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जालिंदर कामठे, प्रवक्ते विजय कोलते, सुदाम इंगळे, दिगंबर दुगार्डे, निरा मार्केट कमिटीचे चेअरमन बबनराव टकले, राष्टवादी कॉग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, गणेश जगताप, पिंपरीच्या सरपंच मिना शेंडकर ,उपसरपंच विजय थेऊरकर ,कृषिभुषण महादेव शेंडकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष कुंभार, सुषमा थेऊरकर, रोहिदास हंबीर, दत्तात्रय हंबीर, अरविंद शेंडकर, उत्तम हंबीर, हरिश्चंद्र थेऊरकर, संपत शेंडकर, पांडुरंग गायकवाड, संतोष गायकवाड अंकुश शेंडकर, शिवाणी थेऊरकर परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. 
   सुप्रिया सुळे म्हणाल्या,.परंतु, सत्ताधाऱ्यांनी खोट्या जाहिरातींवर भरमसाठ खर्च करून सर्वसामान्य शेतक-यांना फसवले आहे. आघाडी सरकारच्या काळात केलेली विकासकामे आम्ही केली असे दाखवुन बारामती लोकसभा मतदार संघात खोट्या जाहिराती केल्या. या सरकारच्या खोट्या कामांची माहिती घेत असून लवकरच राज्य सरकारच्या खोट्या जाहिरातींचा पदार्फाश करणार आहे. तसेच आघाडी सरकार सत्तेवर आले तर सरसकट कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव देणार आहे. यावेळी अनेक लाभार्थींना लाभाचे वाटप करण्यात आले.

Web Title: election loss results due to causes in NCP's : Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.