दिल्लीतील सम-विषम योजना तूर्त स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 07:36 PM2017-11-11T19:36:44+5:302017-11-11T19:39:42+5:30
दिल्लीतील दाट धुक्याच्या समस्येवरील तोडगा म्हणून वाहनांसाठी जाहीर केलेली सम-विषम योजना आम आदमी पार्टीच्या सरकारने मागे घेतली आहे. सोमवारपासून ही योजना अमलात येणार होती. तथापि, या योजनेत ‘फक्त महिलां’साठी धावणाºया वाहनांसह अन्य काही वाहनांना देण्यात आलेली सूट राष्टÑीय हरित लवादाने रद्द केल्यामुळे सरकारने ही योजनाच स्थगित केली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील दाट धुक्याच्या समस्येवरील तोडगा म्हणून वाहनांसाठी जाहीर केलेली सम-विषम योजना आम आदमी पार्टीच्या सरकारने मागे घेतली आहे. सोमवारपासून ही योजना अमलात येणार होती. तथापि, या योजनेत ‘फक्त महिलां’साठी धावणाºया वाहनांसह अन्य काही वाहनांना देण्यात आलेली सूट राष्टÑीय हरित लवादाने रद्द केल्यामुळे सरकारने ही योजनाच स्थगित केली आहे.
दिल्लीचे वाहतूकमंत्री कैलाश गहलोत यांनी या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, या योजनेत दुचाकी वाहने, तसेच फक्त महिलांसाठी धावणाºया वाहनांना सूट देण्यात आली होती. या सवलतीला हरित लवादाने आक्षेप घेतला आहे. आपत्कालीन वाहने वगळता अन्य सर्व वाहनांची सूट रद्द करण्याचे निर्देश लवादाने दिले आहेत. आम्ही लवादाचा आदर करतो. तथापि, सरकार महिलांच्या सुरक्षेशी तडजोड करू शकत नाही. आम्ही कुठलीही जोखीम पत्करू शकत नाही. दुचाकी वाहनांची सूट रद्द करण्याची अटही आम्ही स्वीकारू शकत नाही. कारण एवढ्या बसगाड्या आमच्याकडे नाहीत, त्यामुळे तूर्त आम्ही ही योजना मागे घेत आहोत. सोमवारी आम्ही लवादासमोर नवा अर्ज सादर करू.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सम-विषम योजना मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कैलाश गहलोत, गोपाल राय आणि इम्रान हुसैन यांच्यासह आप सरकारमधील मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.
काय आहे सम-विषम योजना
दिल्लीत सध्या दाट धुके पडले असून, मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यावर तोडगा म्हणून सरकारने १३ ते १७ नोव्हेंबर या काळात सम-विषम योजना आणली होती. सम तारखेला सम क्रमांकाच्या, तर विषम तारखेला विषम क्रमांकाच्या वाहनांनाच दिल्लीच्या रस्त्यावर धावण्याची परवानगी त्यात मिळणार होती. रविवारपर्यंत शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.