पक्ष जरूर वाढवा, पण कोरोना नको; उद्धव ठाकरेंचे थेट विरोधकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 07:52 PM2021-02-21T19:52:12+5:302021-02-21T19:53:22+5:30

Uddhav Thackeray's live speech on Corona: उद्या रात्रीपासून जिथे जिथे वाटतेय तिथे बंधने घाला, पण जनतेला 24 तासांचा वेळ द्या, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, पालकमंत्र्यांना दिले आहेत.

expand your the party, but not Corona; Uddhav Thackeray's appeal to the opposition | पक्ष जरूर वाढवा, पण कोरोना नको; उद्धव ठाकरेंचे थेट विरोधकांना आवाहन

पक्ष जरूर वाढवा, पण कोरोना नको; उद्धव ठाकरेंचे थेट विरोधकांना आवाहन

Next

मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाचे दुप्पट रुग्ण झालेत, राज्याच्या दरवाजावर कोरोनाची दुसरी लाट धडक मारतेय. अचानक लॉकडाऊन करणं घातक असून जे लोक हे उघडा, ते उघडा म्हणून आंदोलन करत आहेत, ते तुम्हाला कोरोनापासून वाचविणार नाहीत. पक्ष जरुर वाढवा, पण कोरोना वाढूव नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केले आहे. (Dont increase Corona Patient; Uddhav Thackeray Fb Live Warning to all political Parties)


उद्या रात्रीपासून जिथे जिथे वाटतेय तिथे बंधने घाला, पण जनतेला 24 तासांचा वेळ द्या, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, पालकमंत्र्यांना दिले आहेत. लाट आलीय की नाही ते आठ-पंधरा दिवसात कळेल. सगळे फिरायला लागलेत. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु केली. मंदिरे उघडली, पण शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. मंत्री नितीन राऊत यांनी मुलाच्या विवाहाचं निमंत्रण दिलेले. पण त्यांनी लग्न सोहळा रद्द केला. याला सामाजिक जाणीव म्हणतात. मी नितीन राऊत यांना जनतेच्यावतीने आशीर्वाद देतो, असे ठाकरे म्हणाले. 


आम्ही आंदोलने केली म्हणून मंदिरे उघडली, असे काहीजण सांगतात. ते तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकत नाहीत. उद्या कोरोनाचा घाला आलाच तर तेही आपल्याला वाचवू शकत नाहीत. तुम्हाला कोरोनापासून वाचवण्यासाठी कोरोना योद्धेच मदतीला येणार आहेत. त्यांचा काही ठिकाणी सत्कार केला जातोय, परंतू तेच सत्कार करणारे मास्क घालत नाहीएत, यामुळे लोकांनी मास्क घालावे, पुढील आठ दिवस मी वाट पाहिन आणि लॉकडाऊनचा निर्णय घेईन, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. आता कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नियोजित वेळेनुसार नागरिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाचं औषध तेव्हाही नव्हतं, आजही नाही. केवळ दिलासा तो लसीचा. सध्या लसीकरण सुरू झालं असून 9 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आलीय. आणखीन दोन-तीन कंपन्या लस देणार आहेत, त्याही लस आपल्याला लवकरच उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मी मुख्यमंत्री म्हणून शिवनेरीवर गेलो, हे माझं भाग्यच. यावेळी, शिवनेरीवर गर्दी कमी होती, पण उत्साह मोठा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रेरणा दिली. वार करण्यासाठी तलवार आणि वार झेलायला ढाल हवी. पण, कोरोनाविरुद्धची लढाई लढताना तलवार नाही, पण मास्क ही आपली ढाल आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 

Web Title: expand your the party, but not Corona; Uddhav Thackeray's appeal to the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.