स्फोटके, वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळलीय, गृहमंत्रालयाने विश्वासार्हता गमावलीय, राज्यातील जनता म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 09:29 PM2021-03-25T21:29:18+5:302021-03-25T21:39:34+5:30

Maharashtra Politics News : अंबानींच्या घराजवळ सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणांमुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. आता एबीपी माझाने केलेल्या मूड जनतेचा या सर्व्हेमधून या घटनांबाबत जनतेचं मत समोर आलं आहे.

Explosives, Waze case has tarnished the image of the state government, the Home Ministry has lost credibility, the people of the state say ... | स्फोटके, वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळलीय, गृहमंत्रालयाने विश्वासार्हता गमावलीय, राज्यातील जनता म्हणते...

स्फोटके, वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळलीय, गृहमंत्रालयाने विश्वासार्हता गमावलीय, राज्यातील जनता म्हणते...

googlenewsNext

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अंबानींच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवण्याचे प्रकरण आणि या प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा (Sachin Vaze) उघड झालेला सहभाग तसेच त्यामधून झालेले धक्कादायक गौप्यस्फोट यामुळे राज्य सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. दरम्यान, या घटनांनंतर राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Politics) आता एबीपी माझाने केलेल्या मूड जनतेचा या सर्व्हेमधून या घटनांबाबत जनतेचं मत समोर आलं आहे. (Explosives, Waze case has tarnished the image of the state government, the Home Ministry has lost credibility, the people of the state say ...)

या सर्व्हेमधून राज्य सरकारने कोरोनाकाळात केलेल्या कामगिरीबाबत विविध प्रश्न विचारून जनतेचा कल जाणून घेण्यात आला. यावेळी अंबानी स्फोटक प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळलीय का? असा प्रश्न विचारला असता तब्बल ४३ टक्के जनतेने होय असे उत्तर दिले आहे. तर २९ लोकांनी नाही, असे उत्तर दिले. तर २८ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले. 

यावेळी वाझे प्रकरणामुळे गृहखात्याने विश्वासार्हता गमावली का असा प्रश्न सर्व्हेमधून विचारला असता ४८ टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले. तर २५ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. उर्वरित २७ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे सांगितले. 
 
या सर्व्हेमध्ये कोरोना काळात ठाकरे सरकारनं परिस्थिती योग्य रितीनं हाताळली का, असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला. त्यावर ४४ टक्के लोकांनी होय, तर ३६ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. तर २० टक्के लोकांनी सांगता येत नाही, असं उत्तर दिलं. लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं का, या प्रश्नाला होय असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण ४८ टक्के, तर नाही असं उत्तर देणाऱ्यांचं प्रमाण ३१ टक्के इतकं आहे. सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण २१ टक्के आहे. एबीपी माझानं याबद्दलचं सर्वेक्षण केलं आहे.

Web Title: Explosives, Waze case has tarnished the image of the state government, the Home Ministry has lost credibility, the people of the state say ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.