राष्ट्रवादीने घेतली फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची फिरकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 01:24 PM2021-04-14T13:24:50+5:302021-04-14T13:31:37+5:30
Bjp Ncp Sangli : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनला विरोध केल्यानंतर त्यांच्या भूमिकेविषयी सात खोचक सवाल राष्ट्रवादीच्या सांगलीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत. भाजपचा महाराष्ट्रद्वेषी चेहरा यातून उघड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सांगली : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनला विरोध केल्यानंतर त्यांच्या भूमिकेविषयी सात खोचक सवाल राष्ट्रवादीच्या सांगलीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत. भाजपचा महाराष्ट्रद्वेषी चेहरा यातून उघड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ताजुद्दीन तांबोळी यांच्या ग्रपसह राष्ट्रवादीच्या व सांगली जिल्ह्यातील अनेक राजकीय व्हॉटस अॅप ग्रुपवर सध्या भाजपला विचारलेले सात सवाल व्हायरल झाले आहेत. याचबरोबर एक व्यंगचित्रही त्यांनी प्रसिद्ध केले असून त्याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना केलेले हे सात प्रश्न सध्या चर्चेत आहेत.
१. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत ८२२ रुपये झालीय तिथे कडाडून विरोध केलेला का ?
२. गॅस सिलिंडरची सबसिडी गुपचूप बंद केलीत त्याला कडाडून विरोध केलेला का ? ?
३. डिझेल पेट्रोलच्या किंमती वाढल्या, डिझेल ८० च्या पुढे आणि पेट्रोल ९० च्या पुढे गेल्यावर कडाडून विरोध केलेला का ?
४. खताच्या गोणीचे भाव थेट ७०० रुपयांनी वाढल्यावर कडाडून विरोध केलेला का ?
५. केंद्राने जीएसटीचे पैसे दाबून ठेवले तेव्हा कडाडून विरोध केलेला का ?
६. कोरोनासंबंधी पीपीई किट, मास्क, औषध खरेदीचे अधिकार राज्यांकडून काढून घेतले तेव्हा कडाडून विरोध केलेला का ?
७. लसीचा पुरवठा करताना मापात पाप केले गेले, तेव्हा कडाडून विरोध केलेला का ?