वचन देतो! मोदी सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही; राकेश टिकैत यांचे भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 08:48 AM2021-01-31T08:48:45+5:302021-01-31T09:01:58+5:30

Farmer Protest: ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसेवरून शेतकरी आंदोलनाची ताकद कमी होऊ लागली होती. मात्र, टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर गाझीपूरसह अन्य सीमांवर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज येऊ लागली आहे. काल रात्रीपर्यंत ५०००० हून अधिक शेतकरी गाझीपूरला येऊन पोहोचले आहेत.

Farmer Protest: Promises! Modi government will not bow before the world; Rakesh Tikait's appeal | वचन देतो! मोदी सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही; राकेश टिकैत यांचे भावनिक आवाहन

वचन देतो! मोदी सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही; राकेश टिकैत यांचे भावनिक आवाहन

Next

गाझियाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांपासून एक कॉल दूर असल्याचे सांगितले. आजही कृषीमंत्र्यांनी दिलेली ऑफर खुली असल्याचे सांगत शेतकरी नेत्यांना आवाहन केले. यावर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारने कायदे रद्द न करण्यामागची अडचण सांगावी, मी वचन देतो सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही, असा शब्दच देऊन टाकला. 


ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसेवरून शेतकरी आंदोलनाची ताकद कमी होऊ लागली होती. मात्र, टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर गाझीपूरसह अन्य सीमांवर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज येऊ लागली आहे. काल रात्रीपर्यंत ५०००० हून अधिक शेतकरी गाझीपूरला येऊन पोहोचले आहेत. यामुळे टिकैत यांना देखील स्फुरन चढले आहे. सरकारची अशी कोणती अडचण आहे की नवीन कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाहीय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 


सरकार शेतकऱ्यांना त्यांची बाजू सांगू शकते. आम्ही शेतकरी असे लोक आहोत जे पंचायत राजवर विश्वास ठेवतो. आम्ही कधी जगासमोर सरकारची मान शरमेने खाली जाऊ देणार नाही. सरकारसोबत आमची वैचारिक लढाई आहे. ही लढाई लाठ्या, काठ्या, बंदुकांनी लढली जाऊ शकत नाही. नाही त्याद्वारे दाबली जाऊ शकते. जेव्हा नवीन कायदे मागे घेतले जातील तेव्हाच आम्ही शेतकरी आपल्या घरी परत जाऊ, असेही टिकैत यांनी सांगितले. 


मोदी सरकार अखेर नरमले! कृषी कायद्यांवर विरोधकांना दिले मोठे आश्वासन
शेतकरी आंदोलनाच्या छायेत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या अभिभाषणावर काँग्रेससह जवळपास 20 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. कृषी कायद्यांवर मोदी सरकारने चर्चाच केली नाही, विरोध पक्षांना महत्व दिले नाही असा आरोप या नेत्यांनी केला होता. आता यावर मोदी सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे. यामुळे मोदी सरकारकडून कृषी कायद्यांवर अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला होता. यामुळे अधिवेशनात कोणताही गोंधळ नको म्हणून मोदी सरकार प्रयत्न करत आहे. 

Farmer Protest : शेतकरी आंदोलन काळात पंजाबमध्ये पाकिस्तानमधून अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ


आंदोलन स्थळ रिकामे करणार होते टिकैत, पण भाजपा आमदाराने सारा खेळ बिघडवला?


 26 जानेवारीला झालेल्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसेवरून गाझियाबाद सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत हे आंदोलन संपविण्याची तयारी करत होते. मात्र, अचानक आमदार महोदय आंदोलनस्थळी पोहोचले आणि सारा खेळच बिघडवून टाकला. टिकैत यांनी त्या आमदारांवरही सरकारसोबत मिळून कट रचत असल्याचा आरोप केला आहे. भारतीय किसान युनियनने आमदार नंद किशोर गुर्जर आणि साहिदाबादचे आमदार सुनिल वर्मावर शेतकरी आंदोलनात गोंधळ घालण्याचे आरोप केले आहेत. नंद किशोर गुर्जर हे गाझियाबादच्या लोनीचे आमदार आहेत. सुत्रांनी सांगितले की, राकेश टिकैत यांनी आंदोलन संपवावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. अधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा योग्य दिशेने जात होता. टिकैत आंदोलन स्थळ रिकामे करण्यास तयार झाले होते. अचानक सारा खेळ बिघडला. भाजपा आमदार गुर्जर त्यांच्या 100 हून अधिक समर्थकांना घेऊन आंदोलनात घुसले. यामुळे टिकैत यांनी अधिकाऱ्यांसोबतची चर्चा अर्धवट सोडली आणि थेट मंचावर जाऊन उभे राहिले. टिकैत यांनी असेच आरोप सुनिल शर्मा यांच्यावर लावले आहेत. 

Web Title: Farmer Protest: Promises! Modi government will not bow before the world; Rakesh Tikait's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.