किसान, जवान व मजदूर आघाडी ४८ जागा लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 01:38 AM2019-01-26T01:38:34+5:302019-01-26T01:38:44+5:30

मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.

 Farmers, Jawans and laborers will contest 48 seats in the alliance | किसान, जवान व मजदूर आघाडी ४८ जागा लढवणार

किसान, जवान व मजदूर आघाडी ४८ जागा लढवणार

Next

पुणे : मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. सरकार शेतकºयांच्या कर्जमाफीचे नुसते आश्वासन देत आहे. त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जात नाही. या सर्व बाबींना लक्षात घेऊन किसान, जवान व मजदूर आघाडीने महाराष्ट्रात
४८ जागा लढवण्याचा निर्णय
घेऊन अब की बार शेतकरी
सरकार स्थापन करणार, अशी माहिती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी किसान, जवान व मजदूर आघाडीचे अध्यक्ष गणेश जगताप, सत्यशोधक शेतकरी समाज प्रमुख किशोर ढमाले, बळीराजा
शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष संजय घाटणेकर, कालिदास आपटे, दिलीप भोयर, बी. जी. पाटील आदी
उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ११ संघटना एकत्र येऊन किसान जवान व मजदूर आघाडी या राज्यव्यापी आघाडीची स्थापना केली आहे. यात ४८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून २० जागेवर प्राथमिक स्वरूपात चर्चा झाली आहे. तर आघाडीच्या वतीने काँग्रेस व भाजपा युती यांच्या विरोधात लढू इच्छिणाºया सपा, बसपा व वंचित बहुजन आघाडी इत्यादी पक्षाशी चर्चा करून ४८ जागांचे नियोजन केले जाणार आहे.
>साखर आयुक्तालयावर बेमुदत आंदोलन
शेतकºयांच्या जमिनीचे भूसंपादन, कमाल जमीन धारणा, पाळीव प्राणी, वन्य प्राणी संरक्षण कायदा, शेतकरीविरोधी कायद्याची अंमलबजावणी करून शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाºया सरकारच्या साखर आयुक्त कार्यालयावर २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बेमुदत धरणे आंदोलन होईल.

Web Title:  Farmers, Jawans and laborers will contest 48 seats in the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.