Farmers Protest : "देशभरात मार्च काढणार अन् गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 08:27 AM2021-02-13T08:27:31+5:302021-02-13T08:38:20+5:30

Rakesh Tikait And Farmers Protest : शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत.

farmers protest rakesh tikait said we will go all over country make gujrat free also told his next strategy | Farmers Protest : "देशभरात मार्च काढणार अन् गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार"

Farmers Protest : "देशभरात मार्च काढणार अन् गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार"

Next

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान आता शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी एक मोठी घोषणा केली. राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच थेट केंद्र सरकारलाच आव्हान दिलं आहे. "देशभरात मार्च काढणार आणि गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार" असं म्हणत राकेश टिकैत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने हरियाणाच्या बहादूरगडमध्ये किसान महापंचायत आयोजित करण्यात आली होती. यात देशभरात मार्च काढण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली. गुजरातला मुक्त करू. कारण गुजरात हे केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे. भारत स्वतंत्र आहे. पण गुजरातमधील जनता ही कैदेत आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना तुरूंगात टाकलं जात आहे असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. तसेच त्यांनी गुजरातमध्ये जाण्याची तारीख अजून निश्चित करण्यात आली नसल्याचं देखील म्हटलं आहे. या आंदोलनाचं राजकारम करून नका असंही टिकैत यांनी म्हटलं आहे. 

"देशात 'टिकैत फॉर्मूला' लागू करून 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा"

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी किमान आधारभूत किंमत अर्थात MSP बाबत एक मोठं विधान केलं आहे. राकेश टिकैत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गव्हाची किंमत थेट सोन्याच्या किमतीशी जोडली आहे. ज्याप्रमाणे सोन्याची किंमत वाढत आहे त्यानुसार गव्हाची किंमत देखील वाढली पाहिजे असं टिकैत यांनी म्हटलं आहे. तसेच 3 क्विंटल (300 किलो) गव्हाची किंमत ही 1 तोळा सोन्याएवढी करायला हवी असंही म्हटलं आहे. यासोबतच देशात "टिकैत फॉर्मूला" लागू करा असं सांगितलं आहे. 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सिंघू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाचं केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. तेव्हापासून या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व राकेश टिकैत यांच्याकडे आलं आहे. अशावेळी टिकैत यांनी MSP बाबत केलेल्या विधानाला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.

"राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

गाझियाबादचे भाजपा आमदार नंद किशोर गुर्जर यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे नेते राकेश टिकैत यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. "राकेश टिकैत हे फक्त दोन हजार रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात" असं गुर्जर यांनी म्हटलं आहे. राकेश टिकैत यांनी आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप केला आहे. गुर्जर यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. "मी टिकैत कुटुंबाचा आदर करतो. मात्र लोकं असं म्हणतात की, राकेश टिकैत हे दोन हजार रुपयांसाठी कुठेही जायला तयार होतात. असं असल्यास ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून त्यांनी असं करू नये" असं नंद किशोर गुर्जर यांनी म्हटलं आहे. 

"राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते", मुख्यमंत्र्यांनी लगावला सणसणीत टोला

हरियाणा (Haryana) चे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांना सणसणीत टोला लगावला आहे. "राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते" असल्याचं खट्टर यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा असं देखील म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. मनोहर लाल खट्टर यांनी राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा मात्र काही काही नेते फस्ट्रेटेड आहेत. त्या नेत्यांची इच्छा काहीतरी वेगळीच असल्याने ते शेतकऱ्यांच्या हिताबद्दल बोलत नाहीत असा आरोप खट्टर यांनी केला आहे. तसेच राकेश टिकैत यांना जर शेतकऱ्यांना समजवायचं असेल तर त्यांनी उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला देखील आवर्जून दिला आहे. 

 

Web Title: farmers protest rakesh tikait said we will go all over country make gujrat free also told his next strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.