Kerala Assembly Election 2021: ट्रान्सजेंडर उमेदवाराची धमक्यांमुळे माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 06:09 AM2021-04-04T06:09:44+5:302021-04-04T06:10:21+5:30

Kerala Assembly Election 2021: डेमॉक्रॅटिक सोशल जस्टीस पार्टीने अनन्याकुमारी यांना उमेदवारी दिली आहे. याच पक्षाचे नेते आपल्याला धमक्या देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

First transgender candidate to contest Kerala election withdraws amid threats, harassment | Kerala Assembly Election 2021: ट्रान्सजेंडर उमेदवाराची धमक्यांमुळे माघार

Kerala Assembly Election 2021: ट्रान्सजेंडर उमेदवाराची धमक्यांमुळे माघार

Next

मलप्पुरम : केरळात विधानसभा निवडणूक लढविणारी पहिलीच पारलिंगी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती ठरलेली अनन्याकुमारी ॲलेक्स यांनी निवडणूक रिंगणातून बाहेर होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्याला धमक्या दिल्या जात असल्यामुळे आपण प्रचार थांबवत आहोत, असे अनन्याकुमारी यांनी सांगितले आहे. 

डेमॉक्रॅटिक सोशल जस्टीस पार्टीने अनन्याकुमारी यांना उमेदवारी दिली आहे. याच पक्षाचे नेते आपल्याला धमक्या देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपलेली आहे. त्यामुळे अर्ज मागे घेता येणार नसला तरी आपण आपला निवडणूक प्रचार थांबवत आहोत, असे अनन्याकुमारी यांनी म्हटले आहे. त्यांच्याविरुद्ध यूडीएफचा घटक पक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लिम लिगचे पी. के. कुन्हालीकुट्टी आणि लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंटचे पी. जिजी हे निवडणूक लढत आहेत.

Web Title: First transgender candidate to contest Kerala election withdraws amid threats, harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.