पाच वर्षात गणेश नाईकांनी राष्ट्रवादी खड्यात घातली, जितेंद्र आव्हाड झाले भाऊक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 02:22 PM2019-07-30T14:22:10+5:302019-07-30T14:24:28+5:30

राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय  सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. पाच वर्षात नाईक यांनी पक्षाची वाट लावली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

In five years, Ganesh Naik was put in the NCP, Jitendra Awhad became Bhauk | पाच वर्षात गणेश नाईकांनी राष्ट्रवादी खड्यात घातली, जितेंद्र आव्हाड झाले भाऊक

पाच वर्षात गणेश नाईकांनी राष्ट्रवादी खड्यात घातली, जितेंद्र आव्हाड झाले भाऊक

Next
ठळक मुद्देपाच वर्षापूर्वीच नाईकांना पक्ष सोडायचा होतापक्षाने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही

ठाणे - गणेश नाईक राष्ट्रवादी सोडणार हे २०१४ मध्येच ठरले होते. या संदर्भात मी वारंवार पक्षाला सांगत होतो, मात्र पक्षाने नेहमी नाईकांना वरची बाजू दिली. परंतु मागील पाच वर्षात नाईकांनी राष्ट्रवादी संपवली असा आणि आज पक्ष अडचणीत असतांना पक्षाला उभारी देण्याऐवजी ते आपला स्वार्थ साधण्याचे काम करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय  सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही पक्ष उभा करु आणि त्याची सुरवात नवी मुंबईतूनच करु असा विश्वास व्यक्त करीत आव्हाड भाऊक झाले.
मागील काही दिवसापासून नाईक कुटुंब हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरु होती. त्यानंतर मंगळवारी संदीप नाईक यांनी आपला राजीनामा दिला आणि सुरु असलेल्या या चर्चांना पूर्णविराम लागला. यावर मात्र आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली असून नाईकांच्या या निर्णयाविरोधात ते भाऊक झाल्याचे दिसून आले. गणेश नाईक यांनी पध्दतशीरपणे राष्ट्रवादी संपवली असल्याचा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात मी वारंवार पक्षाला याची माहिती देत होतो, मात्र माझे दुर्देव असे की माझ्यावर किंवा माझ्या बोलण्यावर पक्षाने सुध्दा विश्वास ठेवला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उलट नाईक यांना नेहमी वरची बाजू पक्षाने दिल्याचेही त्यांनी सांगितले. २०१४ मध्येच नाईक हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु होती. परंतु साहेबांनी नाईक हे आपले बंधुतुल्य सहकारी असल्याचे सांगत ते कधीही गद्दारी करणार नाहीत, असे सांगत होते. मागील पाच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला खड्यात घालण्याचे काम केले. कल्याण डोंबिवलीत सत्ता असतांना आज त्याठिकाणी एकही नगरसेवक नाही, हीच परिस्थिती भिवंडी आणि मिराभाईंदरमध्येही होती. या सर्वांचे नेतृत्व कोण करीत होते, तर ते नाईकच होते. घरी बसून पक्ष चालत नाही, हे त्यांना समजायला हवे होते. मात्र राष्ट्रवादीला संपविण्याचा विडाच त्यांनी उचलला होता असा आरोपही त्यांनी केला.
स्वाभीमानाच्या गप्पा मारणाऱ्या गणेश नाईक यांच्या विरोधात मंदा म्हात्रे वाट्टेल ते बोलत आहेत. भाजपचे अध्यक्ष नाईक यांना आम्ही स्विकारणा नाही असे बोलत आहेत. असे असतांनाही आता कुठे गेला नाईकांचा स्वाभीमान असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीने नाईक कुटुंबाला अख्खी नवी मुंबई दिली होती. सर्व महत्वाची पदे त्यांच्या घरात होती, असे असतांनाही त्यांनी गद्दारी केली. नवी मुंबईचा विकास झाला हे मान्य जरी केले तरी त्यात नाईकांनी आपल्या घराच्यांचाच विकास अधिक केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मला हे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत होते. मात्र पक्षाकडूनच याची दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केले. मात्र आता हा पक्ष पुन्हा एकदा उभा करु आणि त्याची सुरवात नवीमुंबईतूनच करु असा विश्वास आव्हाडांनी शेवटी बोलतांना व्यक्त केला.



 

Web Title: In five years, Ganesh Naik was put in the NCP, Jitendra Awhad became Bhauk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.