ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शंकर नम यांचं  हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 01:09 PM2021-06-05T13:09:17+5:302021-06-05T13:09:51+5:30

राजकीय कार्य लक्षात घेऊन 1985 साली त्यांना काँग्रेस पक्षाने  डहाणू विधानसभा आमदारकीचे तिकीट दिले व त्यामध्ये भरघोस मतांनी निवडणूक आले.

Former Guardian Minister of Thane District Shankar Nam dies of heart attack | ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शंकर नम यांचं  हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन

ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शंकर नम यांचं  हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन

googlenewsNext

कासा दि 5 मे/ शशिकांत ठाकूर : माजी मंत्री, माजी खासदार शंकर नम यांचे शनिवारी उपचारादरम्यान निधन झाले. शंकर सखाराम नम (वय 72)  हे तीन वेळा डहाणू मतदारसंघाचे आमदार, एक वेळा खासदार तर 2 वर्षे ठाणे जिल्हा पालकमंत्री व उपमंत्री होते. डहाणू तालुक्यातील तवा या आपल्या गावातील सरपंचपदापासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. ते डहाणू पंचायत समिती सदस्य होते.

त्यांचे राजकीय कार्य लक्षात घेऊन 1985 साली त्यांना काँग्रेस पक्षाने  डहाणू विधानसभा आमदारकीचे तिकीट दिले व त्यामध्ये भरघोस मतांनी निवडणूक आले. ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. या कालावधीत सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळ त्यांना दोन वर्षे  पाटबंधारे, खारजमीन, आदिवासी विकास आदी विभागाचे राज्यमंत्री  आणि ठाणे जिल्हा पालकमंत्रीपद काम केले होते. त्यानंतर त्यांनी 1999 साली डहाणू लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून लढवली व ते 11 महिने खासदार होते. तसेच राजकीय व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात ते कार्यरत होते.
 

दरम्यान, शुक्रवारी त्याची तबेत बिघडल्याने त्यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याने निधन झाले.

 

Read in English

Web Title: Former Guardian Minister of Thane District Shankar Nam dies of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.