Chaudhary Ajit Singh news: माजी केंद्रीय मंत्री आणि आरएलडीचे अध्यक्ष अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 09:24 AM2021-05-06T09:24:20+5:302021-05-06T09:26:53+5:30
Chaudhary Ajit Singh news: देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह य़ांचे अजित सिंह हे पूत्र होते. अजित सिंह बागपतहून सात वेळा खासदार झाले होते. तर केंद्रीय मंत्रीदेखील राहिले आहेत.
मुजफ्फरनगर : राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह (Chaudhary Ajit Singh) यांचे कोरोनामुळे निधन झाले. मंगळवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली होती. ते गुरुग्रामच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. फुफ्फुसामध्ये संक्रमण वाढल्यामुळे त्यांची तब्येत नाजूक झाली होती. त्यांना 22 एप्रिलला कोरोना झाला होता. (Rashtriya Lok Dal President Chaudhary Ajit Singh passes away, confirms Jayant Chaudhary.)
देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह य़ांचे अजित सिंह हे पूत्र होते. अजित सिंह बागपतहून सात वेळा खासदार झाले होते. तर केंद्रीय मंत्रीदेखील राहिले आहेत. 2001 ते 2003 या काळात ते वाजपेयी सरकारमध्ये कृषी मंत्री राहिले होते. तर युपीए सरकारच्या काळात ते नागरी उड्डाण मंत्री राहिले होते. 2019 मध्ये त्यांनी मुजफ्फरनगर येथून निवडणूक लढविली होती, परंतू त्यांना पराभूत व्हावे लागले होते. पश्चिम उत्तप प्रदेशमध्ये अजित सिंह हे जाटांचे बडे नेते म्हणून ओळखले जातात.
Rashtriya Lok Dal President Chaudhary Ajit Singh passes away, confirms Jayant Chaudhary
— ANI (@ANI) May 6, 2021
He had tested positive for COVID19 on April 20 pic.twitter.com/TfNE5cimE4
शेतकरी आंदोलनामुळे नुकत्याच झालेल्या युपीच्या पंचायत निवडणुकांत अजित सिंह यांच्या आरएलडी पक्षाने पुन्हा या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली होती.
राष्ट्रीय लोकदल के अध्यक्ष,पूर्व केंद्रीय मंत्री चौधरी अजीत सिंह जी का निधन, अत्यंत दुखद!
— Samajwadi Party (@samajwadiparty) May 6, 2021
आपका यूं अचानक चले जाना किसानों के संघर्ष और भारतीय राजनीति में कभी ना भरने वाली जगह छोड़ गया है।
शोकाकुल परिजनों के प्रति संवेदना!
दिवंगत आत्मा को शांति दे भगवान।
भावभीनी श्रद्धांजलि! pic.twitter.com/auOAKKuFGq