भाजपच्या लहान मित्रांनी मागितली चार मंत्रिपदे; महायुतीच्या सरकारसाठी भाजप-सेनेला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 03:58 AM2019-11-01T03:58:31+5:302019-11-01T03:58:55+5:30

भाजप विधिमंडळ पक्षनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव या बैठकीत करण्यात आला.

Four ministers sought by BJP's little friends; BJP-Sena joins for Mahayuti government | भाजपच्या लहान मित्रांनी मागितली चार मंत्रिपदे; महायुतीच्या सरकारसाठी भाजप-सेनेला साकडे

भाजपच्या लहान मित्रांनी मागितली चार मंत्रिपदे; महायुतीच्या सरकारसाठी भाजप-सेनेला साकडे

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमताचा जनादेश मिळाला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेने एकत्र येऊन महायुतीचे सरकार स्थापन करावे. अन्य कोणत्याही पयार्याचा विचार दोन्ही पक्षांनी करू नये. महायुतीचे लवकर सरकार स्थापन करून चार मित्र पक्षांना प्रत्येकी एक या प्रमाणे चार मंत्रिपदे देण्यात यावीत, अशी मागणी महायुतीतील लहान पक्षांच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आली.

रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांच्या सुरुची इमारतीतील शासकीय निवासस्थानी महायुतीच्या मित्रपक्षांची बैठक गुरुवारी केंद्रीय राज्यमंत्रीरामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत झाली. त्या बैठकीला रासपचे नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे प्रमुख आ. विनायक मेटे, रयत क्रांती संघटना प्रमुख राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य अध्यक्ष भूपेश थुलकर, शिवसंग्रामचे राज्य उपाध्यक्ष संदीप पाटील, रासपचे नेते बाळासाहेब दौडतले, महाराष्ट्र क्रांती संघटनेचे नेते सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

भाजप विधिमंडळ पक्षनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव या बैठकीत करण्यात आला. महायुतीचे सरकार स्थापन करताना मित्रपक्षांना प्रत्येकी एक अशी चार मंत्रीपदे देण्यात यावीत. त्यात रिपाइंला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी करणारे ठराव मित्रपक्षांच्या बैठकीत करण्यात आला. सध्या फक्त रासपकडे कॅबिनेट मंत्रिपद आहे. आठवले यांनी देवेंद्र फडणवीस हेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असे बैठकीनंतर सांगितले.

 

Web Title: Four ministers sought by BJP's little friends; BJP-Sena joins for Mahayuti government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.