'बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला, तरीही...', आशिष शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 07:06 PM2021-07-21T19:06:04+5:302021-07-21T19:07:09+5:30

Ashish Shelar : सध्याची अवस्था राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोरात, असे सांगत राज्यातील ठाकरे सरकारवर आशिष शेलार यांनी टीका केली.

The frog tries to swell, it does not become a bull BJPs Ashish Shelar criticize Shiv Sena Sanjay Raut  over PCMC Mayo | 'बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला, तरीही...', आशिष शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा

'बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला, तरीही...', आशिष शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा

Next

पिंपरी-चिंचवड : बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी गाय, बैल होत नाही, असे म्हणत भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर साधला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत (Pimpri Chinchwad Municipal corporation) शिवसेनेचा महापौर होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. यावरून  आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला. (BJPs Ashish Shelar criticize Shiv Sena Sanjay Raut  over PCMC Mayor)

बुधवारी पिंपरी चिंचवड जिल्हा शहर भाजपा कोर कमिटीची बैठक झाली केली. यावेळी  बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी गाय, बैल होत नाही, असे आशिष शेलार म्हणाले. तसेच, ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाले असल्यास केंद्र सरकारवर गुन्हा दाखल करावा, असे संजय राऊत म्हणाले. मात्र असे असेल तर मुंबईतील रुग्णालयांवर गुन्हा दाखल करावा लागेल. मुंबईत अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल, असे आशिष शेलार म्हणाले.

सध्याची अवस्था राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोरात, असे सांगत राज्यातील ठाकरे सरकारवर आशिष शेलार यांनी टीका केली. भूखंडाचे श्रीखंड पार्ट 2 हा धंदा राज्यातील महाविकास आघाडीने सुरू केला आहे. पोलिसांकडून राज्यात वसुलीचे काम सुरू आहे. तसेच, जलयुक्त शिवार योजनेवर आरोप म्हणजे,  ठाकरे सरकारची शेतकरी विरोधी भूमिका आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.  

याचबरोबर, महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की स्वबळ असे करतात, कोण दिल्लीला जातं, तर कोण बैठक घेत आहेत. महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की 108 वेळा स्वबळाचा मंत्र जपत आहेत, असाही टोला आशिष शेलार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरूनही आशिष शेलार यांनी भाष्य केले. फोन टॅपिंगचा कारभार हा केंद्र सरकारचा नाही. असेल तर पुरावा द्यावा, नाही तर गप्प बसा, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

Web Title: The frog tries to swell, it does not become a bull BJPs Ashish Shelar criticize Shiv Sena Sanjay Raut  over PCMC Mayo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.