मध्य भाग ठरविणार निवडणुकीचे भवितव्य, डाव्या आघाडीच्या नेतृत्वात गटबाजीमुळे बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 05:19 AM2021-03-29T05:19:36+5:302021-03-29T05:19:46+5:30
Kerala Assembly Election 2021 : केरळ विधानसभा निवडणुकीचे भवितव्य मध्य केरळमधील मतदार ठरवितात अशी धारणा आहे. याला कारणीभूत आहे पठाणमथिट्टा, कोट्टायम, अलप्पुझा, एर्नाकुलम आणि इडुक्की जिल्ह्यांतील काही भागांत प्रभावशाली शक्तींचे राजकीय आणि सामाजिक अस्तित्व.
कोची : केरळ विधानसभा निवडणुकीचे भवितव्य मध्य केरळमधील मतदार ठरवितात अशी धारणा आहे. याला कारणीभूत आहे पठाणमथिट्टा, कोट्टायम, अलप्पुझा, एर्नाकुलम आणि इडुक्की जिल्ह्यांतील काही भागांत प्रभावशाली शक्तींचे राजकीय आणि सामाजिक अस्तित्व. (Kerala Assembly Elections 2021) केरळ काँग्रेस (मणी) मधील विभाजन आणि त्यानंतर जोसे के. मणी यांच्या नेतृत्वात डाव्या लोकशाही आघाडीच्या (एलडीएफ) नेतृत्वात झालेल्या गटबाजीमुळे अनेक बदल झाले. (The future of the election will be decided by the central part, the change due to factionalism in the leadership of the Left Front)
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एर्नाकुलम जिल्ह्यात केसी (एम) हे ट्रम्प कार्ड म्हणून समोर आले आहे.
पूर्वीचे विरोधक असलेले; पण आता मित्र बनलेल्यांसाठी माकपने रेड कार्पेट अंथरल्याने त्यांच्या स्वतःच्या केडरमध्ये नाराजी पसरली आहे. आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी १३ जागा दिल्या आहेत. यात त्यांच्या हक्काच्या जागा आहेत. असंतोष उफाळून आल्यानंतर कुट्टीडीची जागा मणी यांनी परत माकपला दिली. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहेच. पाला मतदारसंघात मणी सी. कप्पन हे डाव्या आघाडीच्या जोस के. मणी यांच्याशी लढत देत आहेत. पी. जे. जोसेफ यांच्या नेतृत्वात केरळ काँग्रेसचा फुटलेला गट यूडीएफकडे कायम आहे आणि केसी (एम) च्या डाव्या आघाडीच्या उमेदवार असलेल्या थोडोपुझा, कदुथुर्थी, चंगनाशरी आणि इडुक्की या चार मतदारसंघांत थेट लढत देत आहे.