नवीन सीमोल्लंघनासाठी सर्वजण तयार व्हा!; पंकजा मुंडे यांचा समर्थकांना संदेश

By हेमंत बावकर | Published: October 22, 2020 12:26 PM2020-10-22T12:26:16+5:302020-10-22T12:29:18+5:30

Pankaja Munde dasara melava : भगवान गडावरील दसरा मेळाव्याची भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी घोषणा केली. यावेळी त्यांनी यंदाच्या मेळाव्याचे स्वरूप कसे असेल हे सांगितले.

Get ready for a new simollanghan; Pankaja Munde's appeal to supporters on Dashara melava | नवीन सीमोल्लंघनासाठी सर्वजण तयार व्हा!; पंकजा मुंडे यांचा समर्थकांना संदेश

नवीन सीमोल्लंघनासाठी सर्वजण तयार व्हा!; पंकजा मुंडे यांचा समर्थकांना संदेश

Next
ठळक मुद्देदरवर्षीप्रमाणे आपण दसऱ्या मेळाव्याची वाट पाहत असता. मी सुद्धा या मेळाव्याची वाट पाहत असते.आपआपल्या घरी, गावात भगवान बाबांच्या चरणी सर्वांना नतमस्तक व्हायचे आहे. भगवान बाबांचे पूजन करायचे आहे मोठ्या संख्येनं हा कार्यक्रम करायचा आहे

मुंबई : दरवर्षीप्रमाणे आपण दसऱ्या मेळाव्याची वाट पाहत असता. मी सुद्धा या मेळाव्याची वाट पाहत असते. पण, यंदा राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत. , असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. मी स्वत: भगवानगडावर जाऊन दर्शन घेणार आहे आणि तिथूनच फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह येऊन तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे, अशी घोषणा पंकजा यांनी केली. 


भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पेजवर व्हिडीओद्वारे सर्व समर्थक आणि भगवान भक्तांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. 


'दरवर्षीप्रमाणे आपण दसऱ्या मेळाव्याची वाट पाहत असता. मी सुद्धा या मेळाव्याची वाट पाहत असते. गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा सुरू केली आहे, ती आपण पुढे नेण्याची आपली जबाबदारी आहे. पण, यंदा राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थिती असल्यामुळे यंदा तुम्हा सर्वांचे आरोग्य मला धोक्यात घालायचे नाही. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत. आपआपल्या घरी, गावात भगवान बाबांच्या चरणी सर्वांना नतमस्तक व्हायचे आहे. भगवान बाबांचे पूजन करायचे आहे मोठ्या संख्येनं हा कार्यक्रम करायचा आहे', असं आवाहन पंकजा मुंडेंनी केले.

खडसेंनंतर पंकजा मुंडेंना शिवसेनेची ऑफर, देवेंद्र फडणवीस म्हणतात...


माझा मेळावा कसा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मी कालच मराठवाड्याचा दौरा केला. तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. आपल्या दसऱ्या मेळाव्याला दरवर्षी लाखोंची गर्दी जमा होत असते. सावरगाव इथं लाखो कार्यकर्ते हे भगवानगडावर जमा होत असतात, त्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घ्यावा लागला आहे, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले. मी स्वत: भगवानगडावर जाऊन दर्शन घेणार आहे आणि तिथूनच फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह येऊन तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. चला मग या नवीन सीमोल्लंघनासाठी सर्वजन तयार व्हा, असे आवाहन पंकजा यांनी केले आहे. 

खडसेंच्या राजीनाम्यामुळे चर्चा

शुक्रवारी एकनाथ खडसे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ मनगटावर बांधतील, खडसेंच्या भाजपा सोडण्याने पक्षाला मोठा धक्का बसला असताना आता पंकजा मुंडे यांच्याबाबतीत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

Web Title: Get ready for a new simollanghan; Pankaja Munde's appeal to supporters on Dashara melava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.