“गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो..; एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लीपवर महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 07:46 PM2021-04-28T19:46:34+5:302021-04-28T19:54:56+5:30

एका तरुणाने एकनाथ खडसेंना फोन करून पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली होती. जामनेर तालुक्यातील वडगाव गावातील हा तरूण होता.

“Girish just picks up girls phone ..; Mahajan strong response to Eknath Khadse over audio clip | “गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो..; एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लीपवर महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर

“गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो..; एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लीपवर महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर

Next
ठळक मुद्देतुमचे आमदार गिरीश काय करतात? इकडे तिकडे बायकांच्या मागे फिरतो का? ही ऑडिओ क्लीप जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालीपाणी सोडून आमदार पश्चिम बंगालमध्ये फिरत होते. ३५ दिवस आमदार मतदारसंघात नव्हते, लोकांना प्यायला पाणी नाही म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला

जळगाव – जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील नेतृत्वाचा वाद नवा नाही. त्यातच एकनाथ खडसेंनीभाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आता महाजनविरुद्ध खडसे असं राजकीय वाद जिल्ह्यात अनेकदा पाहायला मिळतो. जळगावात गेल्या काही दिवसांपासून एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लीपवरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जुंपल्याचं दिसून येते.(Political dispute between BJP Girish Mahajan and NCP Eknath Khadse)  

एका तरुणाने एकनाथ खडसेंना फोन करून पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली होती. जामनेर तालुक्यातील वडगाव गावातील हा तरूण होता. त्यावर खडसेंनी तुमचे आमदार गिरीश काय करतात? इकडे तिकडे बायकांच्या मागे फिरतो का? त्यावर तरूणाने ते फोन उचलत नाही असं सांगितलं तेव्हा खडसेंनी तो फक्त पोरींचे फोन उचलतो असा टोला लगावला होता. ही ऑडिओ क्लीप जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यानंतर एका पत्रकाराने या ऑडिओची पुष्टी करण्यासाठी एकनाथ खडसेंना फोन केला तेव्हा तो ऑडिओ माझाच असल्याचं खडसेंनी स्पष्ट केले.

शर्यतीत होतोच, मीच मुख्यमंत्री होणार होतो, पण..."; एकनाथ खडसेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

पाणी सोडून आमदार पश्चिम बंगालमध्ये फिरत होते. ३५ दिवस आमदार मतदारसंघात नव्हते, लोकांना प्यायला पाणी नाही म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला. गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील लोकांनी गेल्या महिनाभरापासून माझ्याकडे तक्रार केली. पिण्याचं पाणी नाही, हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होत नाही. आपली जबाबदारी सोडून तीन तीन आठवडे पश्चिम बंगालमध्ये प्रचार करायला जाणं कितपत योग्य आहे का? असा सवाल एकनाथ खडसेंनी विचारला होता.

त्यानंतर या ऑडिओ क्लीपवर उत्तर देताना गिरीश महाजनांनीही खडसेंना फटकारलं आहे. गिरीश महाजन म्हणतात की, मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत असलेल्या व्यक्तीनं एका शाळकरी मुलाशी कसं बोलायला हवं? याचे भानही राहिलेले नाही. किमान त्याचा विचार तरी व्हायला हवा होता. एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त झालेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे मला आता त्यात लक्ष घालावचं लागेल. खडसेंचा इलाज मलाच करावा लागेल असं महाजनांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन यांचा वाद जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: “Girish just picks up girls phone ..; Mahajan strong response to Eknath Khadse over audio clip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.