पुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 08:31 PM2020-09-30T20:31:48+5:302020-09-30T22:01:40+5:30

ऑडिओ क्लीप व्हायरल होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत एकनाथ खडसे हे आपल्या जळगावात येथील निवासस्थानातून  सहभागी झाले होते.

Give big news in the next three or four days; BJP leader Eknath Khadse finally decided? | पुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं?

पुढील तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ; भाजपा नेते एकनाथ खडसेंचं अखेर ठरलं?

Next
ठळक मुद्देपक्षातील विविध आघाड्यांवर सातत्याने डावलले जात असल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे हे नाराजभाजपच्या ऑनलाइन बैठकीत नाराज एकनाथ खडसे सहभागी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली

जळगाव : आपल्या पक्षांतरा संदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा विषय जुना झाला असून आता तीन-चार दिवसात आपण मोठी बातमी देऊ, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे दिली. भाजपाच्या बैठकीत ऑनलाइन सहभागानंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. या बैठकीनंतर ही खडसे समाधानी नसल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले.

पक्षातील विविध आघाड्यांवर सातत्याने डावलले जात असल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे हे नाराज असून याविषयी त्यांनी अनेक वेळा उघड भाष्य केले आहे. त्यानंतर मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी महिनाभरात आपण निर्णय घेणार असून दुसऱ्या पक्षात केवळ काय पद मिळते याची प्रतीक्षा आहे, असा संवाद असलेली ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लीप व्हायरल होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत एकनाथ खडसे हे आपल्या जळगावात येथील निवासस्थानातून  सहभागी झाले होते.

या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय संघटक प्रमुख संतोष कुमार, केंद्रीय मंत्री सतीश गंगवार, विजय पुरानिक, सुधीर मनगुंटीवार आदी नेते सहभागी झाले होते. या बैठकीत पक्ष संघटन, विविध राजकीय घडामोडी व इतर विषयांवर चर्चा झाली.

'तो' विषय जुना

या बैठकीमध्ये काय चर्चा झाली याविषयी माहिती देणे खडसे यांनी टाळले. तसेच कार्यकर्ता व खडसे यांच्यातील संवादाच्या व्हायरल झालेल्या क्लिप बद्दल विचारले असता तो विषय आता जुना झाला असून तीन-चार दिवसात मोठी बातमी देतो, असे सांगून बैठकीनंतरही समाधान झाले नसल्याचे संकेत खडसे यांनी दिले. या बैठकीमध्ये ऑडिओ क्लिप विषयी देखील विचारणा झाल्याची माहिती असून त्याविषयी मात्र खडसे यांनी बोलणे टाळले. तसेच क्लीप मधील संवादानंतर राष्ट्रीय स्तरावरील नेते खडसे यांची भूमिका जाणून घेण्यासाठी सहभागी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये

या बैठकीमध्ये कोण कोण सहभागी झाले याविषयी माहिती देताना खडसे यांनी वरील नेत्यांचे नाव सांगितले व शेवटी 'फडणवीस हे बिहारमध्ये आहे', असे सांगायला देखील ते विसरले नाही.

आठवडाभराच्या घडामोडींचा आढावा

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली व त्यानंतर गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मते जाणून घेतली होती. त्यापाठोपाठ लगेच महिनाभरात निर्णय घेणार असल्याचा संवाद असलेली क्लीप व्हायरल झाली. या सर्व घडामोडीं नंतर भाजपाने ऑनलाईन बैठक बोलावून खडसे यांना त्यात सहभागी होण्याचे कळविले होते.

Web Title: Give big news in the next three or four days; BJP leader Eknath Khadse finally decided?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.