"पोटनिवडणुकीचे तिकीट द्या, अन्यथा कमळ हाती घेणार"; शिवसेनेच्या माजी आमदाराचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 07:40 PM2021-05-07T19:40:49+5:302021-05-07T19:55:07+5:30

Maharashtra Politics News : पंढरपूरच्या निकालांनंतर महाविकास आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असतानाच आता राज्यात होणाऱ्या अजून एका विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये धुसफूस वाढताना दिसत आहे.

"Give a ticket for the Deglur by-election, otherwise the lotus will take over"; Former Shiv Sena MLA's Subhash Sabane warning | "पोटनिवडणुकीचे तिकीट द्या, अन्यथा कमळ हाती घेणार"; शिवसेनेच्या माजी आमदाराचा इशारा

"पोटनिवडणुकीचे तिकीट द्या, अन्यथा कमळ हाती घेणार"; शिवसेनेच्या माजी आमदाराचा इशारा

Next

नांदेड/मुंबई - नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत (Deglur by-election) महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा भाजपाने दारुण पराभव केला होता. पंढरपूरच्या निकालांनंतर महाविकास आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असतानाच आता राज्यात होणाऱ्या अजून एका विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये धुसफूस वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या देगलूर मतदारसंघात पुढच्या काही महिन्यांमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या काँग्रेसकडे असलेल्या या जागेवर शिवसेनेच्या माजी आमदाराने दावा ठोकला आहे. तसेच शिवसेनेने तिकीट न दिल्यास भाजपात प्रवेश करू अशा इशारा दिला आहे.  ("Give a ticket for the Deglur by-election, otherwise the lotus will take over"; Former Shiv Sena MLA's Subhash Sabane warning)

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली होती. पंढरपूरमध्ये कुणाला उमेदवारी द्यायची यावरून राष्ट्रवादीत बराच खल झाला होता. अखेरीस भालकेंचे पुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपा उमेदवार समाधान अवताडे यांनी भगिरथ भालके यांचा पराभव केला होता. पंढरपूरमध्येही शिवसेनेच्या स्थानिक महिला नेत्यांनी बंडखोरी केली होती. दरम्यान, आता पंढरपूरची पुनरावृत्ती आता देगलूरमध्येही होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसेच शिवसेनेच्या माजी आमदारांकडून महाविकासा आघाडीवर दबाव वाढवण्याची खेळी सुरू आहे. 

एकीकडे देगलूरच्या रिक्त जागेवर अंतापुरकर यांच्या पुत्राला उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. मात्र शिवसेनेच्या माजी आमदारांनी दंड थोपटून मैदानात उतरण्याची घोषणा केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. सुभाष साबणे हे याआधी दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. मात्र मागच्या निवडणुकीत त्यांना अंतापूरकर यांनी पराभूत केले होते. 

दरम्यान, येथे शिवसेना आणि काँग्रेस हे यापूर्वी वेगळे लढले होते. पुढच्या काळातही वेगळे लढतील. त्यामुळे ही पोटनिवडणूक लढण्याची माझी इच्छा आहे. मी पक्षप्रमुख्यांकडे उमेदवारी मागणार आहे. पालघरप्रमाणे शिवसेनेने ही जागा काँग्रेसकडून मागून घ्यावी. पंढरपूरची पुनरावृत्ती देगलूरमध्ये होऊ नये, असेही ते म्हणाले. 
 

Web Title: "Give a ticket for the Deglur by-election, otherwise the lotus will take over"; Former Shiv Sena MLA's Subhash Sabane warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.