स्वस्त पेट्रोल, डिझेल हवेय तर अफगाणिस्तानला जा; भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:42 PM2021-08-20T12:42:33+5:302021-08-20T12:43:10+5:30
BJP leader says Petrol cheaper in Taliban Afghanistan: देशातील महागलेल्या पेट्रोल, डिझेलवर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा या नेत्याने अफगाणिस्तानातून भरून आणा असे म्हटले आहे.
कोरोना संकटामध्ये देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाला आहे. महागाई वाढली आहे. असे असताना मध्य प्रदेशमध्ये भाजपाच्या एका नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. (go to Afghanistan, there petrol is 50 rupees litre, but no one is there to purchase it, BJP Leader Says.)
Vida Samadzai: मिस अफगानी! बिकिनी घालून रँम्प वॉक, बिग बॉसमध्ये रोमान्स; देशात उडवलेली खळबळ
भाजपाचे मध्य प्रदेशमधील या नेत्याने म्हटले की, जर तुम्हाला पेट्रोल, डिझेल स्वस्त हवे असेल तर तालिबान राजवटीच्या अफगाणिस्तानात जावे, तिथे पेट्रोल स्वस्त मिळत आहे. भाजपाचे कटनी जिल्हाध्यक्ष रामरतन पायल यांनी पत्रकारांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढच्या किंमतीवर प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी भडकून तालिबान, तिकडे जा, पेट्रोल 50 रुपयांना मिळते. तिथेच भरून घेऊन या. तिथे भरणारा देखील कोणी नाहीय, असे वक्तव्य केले.
#BREAKING : BJP #Katni, #MadhyaPradesh district president Ramratan Payal responding to a question on inflation and on expensive petrol in #India, urges to go to #Afghanistan, there petrol is 50 rupees litre, but no one is there to purchase it.
— Sushmit Patil Сушмит Патил सुश्मित पाटिल 🇮🇳 (@PatilSushmit) August 19, 2021
BTW What about cooking oil? pic.twitter.com/jR8lZ4xO1I
देशात कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. तिसरी लाट येणार आहे. देश कोणत्या परिस्थितीतून जात आहे तुम्हाला माहिती आहे का, लोकांना फक्त पेट्रोल, डिझेलची पडली आहे, असे त्यांनी पत्रकारांना पुढे सांगितले.
Afghanistan crisis: जगभरातील मोबाईल, इलेक्ट्रीक कार स्वस्त करू शकते अफगानिस्तान, कसे?
भाजपाच्या या वादग्रस्त विधानावर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेसने सांगितले की, भाजपा नेत्यांची भाषणबाजी सुरु आहे. रामरतन पायल यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा त्यांनी अफगाणिस्तानला जा, तिथे 50 रुपयांना पेट्रोल मिळते असे सांगितले. भाजपा नेत्यांना सद्बुद्धी द्यावी, असे म्हटले आहे.
Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय