Goa Election 2022: “उत्पल पर्रिकर पणजीमधून निवडणुकीसाठी उभे राहिले तर…”; संजय राऊतांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 05:40 PM2022-01-15T17:40:54+5:302022-01-15T17:42:30+5:30

Goa Election 2022: मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला ज्या पद्धतीने अपमानित केले जातेय, ते गोव्याच्या जनतेला आवडलेले नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

goa election 2022 sanjay raut reaction on utpal parrikar to stand to contest from panaji | Goa Election 2022: “उत्पल पर्रिकर पणजीमधून निवडणुकीसाठी उभे राहिले तर…”; संजय राऊतांचे सूचक विधान

Goa Election 2022: “उत्पल पर्रिकर पणजीमधून निवडणुकीसाठी उभे राहिले तर…”; संजय राऊतांचे सूचक विधान

Next

मुंबई: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Goa Election 2022) राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. गोव्यातील राजकीय रणधुमाळीने वेग घेतला आहे. भाजपची राज्य असलेल्या गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकीकडे अधिक लक्ष लागून राहिले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांच्या तिकिटावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्पल पर्रिकर यांच्या निवडणूक लढवण्याविषयी सूचक विधान केले आहे. 

उत्पल पर्रिकरांचे वडील मनोहर पर्रिकर हे गोव्यातील प्रमुख नेते होते. भाऊसाहेब बांदोडकरानंतर गोव्यावर त्यांचा मोठा प्रभाव होता. या गोव्यात भाजपचे संघटन वाढवण्यात रुजवण्यात पर्रिकरांचा महत्वाचा वाटा होता. पर्रिकरांनी गोव्याला आकार देण्याचा प्रयत्न केला, विकास केला नक्कीच. पर्रिकरांकडे दूरदृष्टी होती, गोव्यासारख्या लहान राज्यातील हा माणूस देशाचा संरक्षणमंत्री झाला. पण त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांच्या मुलाने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ज्या पद्धतीने त्यांचा अपमान केला जातोय, अपमानित केले जातेय, ते जनेतला आवडलेले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

गोव्याच्या जनतेला काही आवडलेले नाही

उत्पल पर्रिकर यांच्याबाबतीत जे भाजप वागतेय, हे गोव्याच्या जनतेला काही आवडलेले नाही. पण, शेवटी निर्णय कोणी घ्यायचा आहे, तर उत्पल पर्रिकरांनी घ्यायचा आहे. हिंमत दाखवा, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही लढायला समोर या, आम्ही तुमच्यासोबत आहोत. घरात बसून लढाया होत नाहीत किंवा कागदावर चार भिंतींमध्ये, तुम्ही हिंमत असेल तर समोर या. आव्हान द्या. मी खात्रीने सांगतो जर उत्पल पर्रिकर लढण्यासाठी बाहेर पडले आणि पणजीमध्ये निवडणुकीसाठी उभा राहिले, तर ते निवडून येतील आणि गोव्याची जनता त्यांच्या पाठीशी राहील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

पर्रिकर राजकारणाच्या पलिकडचे व्यक्तिमत्व

उत्पल पर्रिकरांना सर्वोतोपरी शिवसेना मदत करणार, ते सांगतील ती मदत करू. आम्हीच कशाला इतर देखील अनेक पक्ष मदत करतील. पर्रिकर हे राजकीय पक्षाच्या किंवा राजकारणाच्याही पलिकडचे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर जर अन्याय होत असेल आणि ते धाडसाने पुढे येऊन काही करणार असतील, तर शिवसेनाच कशाला इतर देखील समाज, इतर देखील राजकीय पक्ष उत्पल पर्रिकरांना मदत करतील, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, शिवसेना साधारण १४-१५ जागा लढेल अशी आमची एक भूमिका आहे. कोणाबरोबरही युती होत नाही आणि होण्याची शक्यता नाही. कारण, काँग्रेस आणि भाजपने आपआपले उमेदवार दिलेले आहेत. नक्कीच काँग्रेसने आम्हाला काही जागा देण्याचा प्रयत्न केला. दोन किंवा तीन जागा ते आम्हाला देत होते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत आहे. आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे एकत्र येऊन गोव्यात निवडणूक लढवू. साधारण दोन ते तीन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल पटेल हे गोव्यात येतील, मी देखील असेल आणि आम्ही आमच्या जागा जाहीर करू, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 
 

Web Title: goa election 2022 sanjay raut reaction on utpal parrikar to stand to contest from panaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.