"योगी आदित्यनाथ अडीच तास आरती करणारे संन्यासी, त्यांच्या तेजाने नष्ट व्हाल"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 11:56 AM2021-07-06T11:56:18+5:302021-07-06T12:07:45+5:30

ravi kishan : गोरखपूरचे भाजपा खासदार रवी किशन  (BJP MP Ravi Kishan)  यांनीही असदुद्दीन औवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

gorakhpur bjp mp ravi kishan challenges asaduddin owaisi on cm yogi comment  | "योगी आदित्यनाथ अडीच तास आरती करणारे संन्यासी, त्यांच्या तेजाने नष्ट व्हाल"

"योगी आदित्यनाथ अडीच तास आरती करणारे संन्यासी, त्यांच्या तेजाने नष्ट व्हाल"

Next

गोरखपूर : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीला (UP Assembly Elections) अजून काही महिने शिल्लक आहेत, मात्र यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपले धोरण आखण्यात व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशात सत्तेत असलेली भाजपा 'मिशन २०२२' साठी सतत मंथन करीत आहे, तर समाजवादी पक्षही विजयाच्या रणनीतीअंतर्गत युती करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचबरोबर, बसपा सुप्रिमो मायावती यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि योगी आदित्यनाथ यांच्यात शाब्दीक लढाई रंगत आहे.

योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री होऊ देणार नसल्याचे असदुद्दीन औवेसी  (AIMIM Chief Asaduddin Owaisi यांनी म्हटले आहे. तर, योगी आदित्यनाथ यांनी असदुद्दीन ओवैसी हे मोठे नेते असल्याचे वक्तव्य करत त्यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे. तसेच, भाजपा 300 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवणार असल्याचा दावा, योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. दरम्यान, गोरखपूरचे भाजपा खासदार रवी किशन  (BJP MP Ravi Kishan)  यांनीही असदुद्दीन औवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

असदुद्दीन ओवैसी यांच्या विधानानंतर भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजपाचे खासदार रवी किशन म्हणाले की, 'मी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना जाहीरपणे आव्हान देतो, आव्हान स्वीकारले आहे? महाराजजींना (योदी आदित्यनाथ) स्पर्श करून दाखवा, तुम्ही हैदराबादला पळून जाल.' याचबरोबर, भाजपाचे खासदार रवी किशन यांनी सहजनवा येथील कार्यक्रमात सांगितले की, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ब्रह्मचर्यचे पालन करणारे आहेत आणि दररोज अडीच तास आरती करणारे संन्यासी आहेत. असदुद्दीन ओवैसी तुम्ही त्यांच्या तेजाने नष्ट व्हाल.'

आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही - असदुद्दीन ओवैसी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे मोठे नेते असल्याचे वक्तव्य करत त्यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे. कोणत्याही परिस्थितीत २०२२ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही, असे वक्तव्य असदुद्दीन ओवैसी यांनी केले होते. "असदुद्दीन ओवैसी हे मोठे नेते आहेत आणि ते देशात प्रचारही करतात. त्यांना एका विशेष समाजाचे समर्थनही आहे. परंतु ते उत्तर प्रदेशात भाजपला आव्हान देऊ शकत नाही. भाजप आपली मूल्ये आणि मुद्दे घेऊन निवडणुकांच्या मैदानात असेल. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकार करतो," असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. 

300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल - योगी आदित्यनाथ
पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे. त्यातच, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 403 पैकी 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये भाजपाने 75 पैकी 67 जागांवर विजय मिळवला आहे. त्याबद्दल भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करताना, योगींनी हा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम हा पक्ष उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढवणार आहे. 

Web Title: gorakhpur bjp mp ravi kishan challenges asaduddin owaisi on cm yogi comment 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.