मी काय गुन्हा केला ते सरकारने आणि भाजपने सांगावे !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 05:13 PM2019-02-04T17:13:18+5:302019-02-04T17:14:53+5:30

पक्ष आणि सरकारला माझा प्रश्न आहे की, मी काय गुन्हा केला हे सांगा. मी गुन्हा केला असेल, तर राजकारणातून निवृत्त होईन, असे सांगत तुमचा मंत्री आणि तुमच्या मनातील नाथाभाऊ मीच आहे, अशी फटकेबाजी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुण्यात केली. 

the government and the BJP shoul tell me that which crime I have committed | मी काय गुन्हा केला ते सरकारने आणि भाजपने सांगावे !

मी काय गुन्हा केला ते सरकारने आणि भाजपने सांगावे !

Next

पुणे : गेल्या ४० वर्षात मी एकही निवडणूक हरलो नाही. या काळात संघर्ष करीत पारदर्शी कारभार केला. तरीही मला भ्रष्टाचारी ठरविले. माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथ मुंडे आणि मी राजकारणातील गुन्हेगारी व भ्रष्टाचारावरोधात लढा दिला. तरीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते खरे की खोटे, हे कोणी पहात नाही. पक्ष आणि सरकारला माझा प्रश्न आहे की, मी काय गुन्हा केला हे सांगा. मी गुन्हा केला असेल, तर राजकारणातून निवृत्त होईन, असे सांगत तुमचा मंत्री आणि तुमच्या मनातील नाथाभाऊ मीच आहे, अशी फटकेबाजी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुण्यात केली. 

             न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे संस्थेच्या सभागृहात चौथ्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते.यातील  राजकारण आणि आश्वासन या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

              एकनाथ खडसे म्हणाले, गुन्हेगारी विरोधात लढा देऊनही माझे दाऊदच्या बायकोशी संभाषण झाल्याचे संबंध जोडले गेले. ते खरे की खोटे हे कोणी पहात नाही. त्यामुळे ही खंत मी वारंवार बोलून दाखविणार आहे. गोपीनाथ मुंडे आणि मी राजकारणातील गुन्हेगारीविरोधात लढा उभारला होता. मात्र आता इतरांसारखे केव्हा झालो हे लक्षात आले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  ते पुढे म्हणाले, कोणाकडे पाहून राजकारणात येण्याची आता हमी देता येत नाही. राजकारण्यांपेक्षा उत्कृष्ट अभिनेते व कलाकार कोणीही नाही. वरुन आणि आतून वेगवेगळे चेहरे पहायला मिळतात. राजकारणात कृतघ्न माणसांची संख्या जास्त असून राजकारणाची दशा आणि दिशा बदलायची असेल, तर युवकांनी राजकारणात यायला हवे. 

Web Title: the government and the BJP shoul tell me that which crime I have committed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.