“राज्यपाल नियुक्तीसाठी ठाकरे सरकारकडून जाणाऱ्या १२ जणांच्या नावाची यादी फेटाळणार हे ठरलंय”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 01:46 PM2020-11-02T13:46:02+5:302020-11-02T14:10:32+5:30

Politics, vidhanparisahad, Hasan Mushrif, bhagat singh koshyari, chandrakant patil , Vinay Kore , kolhapur; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप

Governor to reject Mahavikas Aghadi's 12-seat recommendation: Mushrif's assassination | “राज्यपाल नियुक्तीसाठी ठाकरे सरकारकडून जाणाऱ्या १२ जणांच्या नावाची यादी फेटाळणार हे ठरलंय”

“राज्यपाल नियुक्तीसाठी ठाकरे सरकारकडून जाणाऱ्या १२ जणांच्या नावाची यादी फेटाळणार हे ठरलंय”

Next
ठळक मुद्देमहाविकास आघाडीकडील १२ जागांच्या शिफारशी राज्यपाल फेटाळणार हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर : विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांवर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच महाविकास आघाडीकडून करण्यात येणाऱ्या १२ जागांच्या शिफारशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी फेटाळतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विनय कोरे यांना खासगीत सांगितल्याचा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केला.

कोल्हापूरात आज हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ जागांची नियुक्ती करणार आहे. यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे शिफारशी पाठविण्यात येत आहेत. परंतु, या शिफारशी भाजप नियुक्त राज्यपालांकडून फेटाळण्यात येतील, अशी व्यवस्था केल्याची माहिती विनय कोरे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.

कला, साहित्य, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. त्यांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेत १२ सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून सहसा स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.
 

Read in English

Web Title: Governor to reject Mahavikas Aghadi's 12-seat recommendation: Mushrif's assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.