ग्रामपंचायती 60! राष्ट्रवादी 40, भाजपाचा 38 वर दावा; इंदापुरवर वर्चस्व कोणाचे?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 07:33 PM2021-02-10T19:33:06+5:302021-02-10T19:35:16+5:30
Indapur Gram Panchayat Politics : तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर ६० ग्रामपंचायतींमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी वेगवेगळे दावे करीत वर्चस्वाचा दावा केला होता. याविषयी तालुक्यात चर्चा होती.
- सतीश सांगळे
कळस : इंदापूर तालुक्यात पार पडलेल्या ६० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप पक्षाच्या वतीने वर्चस्वाचा दावा करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींवरील वर्चस्वाच्या दाव्यांवरुन राष्ट्रवादी काँग्रेस—भाजप आमनेसामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ४० ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. तर भाजपने ३८ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायतीवर सरपंच नेमका कोणत्या पक्षाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस हा कलगीतुरा रंगणार आहे. (Who is king in Indapur Taluka Gram panchayat Election.)
तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर ६० ग्रामपंचायतींमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी वेगवेगळे दावे करीत वर्चस्वाचा दावा केला होता. याविषयी तालुक्यात चर्चा होती. दोन दिवसात ६० ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या निवडी झाल्या. त्यामध्ये एकूण कोणाचे किती सरपंच याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
भाजपच्या थापा! इंदापूर तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता; दत्तात्रय भरणेंचा दावा
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ४० ग्रामपंचायतीवर यश मिळाल्याचा दावा केला आहे. २ ग्रामपंचायतीत संमिश्र यश असल्याचे सांगितले. याबाबत मंत्री भरणे यांनी एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ३८ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आलेल्या यादीमध्ये सपकळवाडी, अकोले, पोंधवडी, लोणी देवकर, चिखली, निमगाव केतकी, निंबोडी, अंथुर्णे, रुई, बळपुडी, भांडगाव, हगारेवाडी, काटी, कळस, तरंगवाडी, तक्रारवाडी, नरसिंगपूर, लासुर्णे, शेटफळगडे, पिंपरी बुद्रुक, शहा, निमसाखर, सणसर, गोतोंडी, सराफवाडी, चांडगाव, व्याहळी, कुंभारगाव, कळंब, पिंपळे, भरणेवाडी, चाकाटी, गिरवी, कडबनवाडी, पळसदेव, घोरपडवाडी, कचरवाडी (निमगाव केतकी), सरडेवाडी, कौठळी, जाचक वस्ती, जाधववाडी, भोडणी या गावांचा समावेश आहे.
भाजपच्या वतीने चांडगाव, लोणी देवकर, बळपुडी, भावडी, अकोले, शेटफळगढे, पिंपळे, निरगुडे, भिगवण, कुंभारगाव, भादलवाडी, निरवांगी, दगडवाडी, पिटकेश्वर, सराफवाडी, व्याहळी, वरकुटे खुर्द, हगारवाडी, गोतंडी, निमसाखर, वालचंदनगर, कळंब, सरडेवाडी, गलांडवाडी नं. १, गलांडवाडी नं. २, बाभुळगाव, गोंदी, भांडगाव, नृसिंहपूर, टणू,भोडणी, कचरवाडी (बावडा), पिठेवाडी, निंबोडी, तावशी, जाधववाडी, रेडा, कचरवाडी (निमगाव) या ग्रामपंचायतीवर दावा करण्यात आला आहे.
तालुक्यात कोणी काही दावा केला तरी ४० ग्रामपंचायतीत यश मिळाले आहे २ ग्रामपंचायतीत संमिश्र यश आहे. ग्रामपंचायतीचा विकास आराखडा बनवून विकासाला प्राधान्य दिले जाईल. विकासकामासाठी निधी कमी पडु देणार नाही.
- दतात्रय भरणे, राज्यमंत्री
तालुक्यातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत तसेच सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये बहुमताने भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. या निवडीत भाजपचे सर्वाधिक ३८ सरपंच व उपसरपंच झाले आहेत. तालुक्यातील जनतेने सत्ताधाºयांच्या विरोधात स्पष्ट विरोधी कौल दिला आहे.
- हर्षवर्धन पाटील , माजी मंत्री