Hathras gangrape case : हाथरसच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगी सरकारवर घणाघात, म्हणाल्या....

By बाळकृष्ण परब | Published: October 1, 2020 10:35 AM2020-10-01T10:35:13+5:302020-10-01T10:39:47+5:30

Hathras gangrape case : उत्तर प्रदेशमध्ये केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढावो अभियानाच्या अगदी विरोधात कारभार सुरू आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

Hathras gangrape case : Supriya Sule lashes out at Yogi Sarkar over Hathras gangrape case, says .... | Hathras gangrape case : हाथरसच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगी सरकारवर घणाघात, म्हणाल्या....

Hathras gangrape case : हाथरसच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा योगी सरकारवर घणाघात, म्हणाल्या....

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशात बेटी बचाओ, बेटी पढावो, या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या अगदी उलट कारभार हाथरस येथील घटनेनंतर बलरामपूर येथे सामूहिक बलात्कार व हत्येची आणखी एक घटना या अमानुष घटना थांबविण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कठोर कायदे करण्याची व ते राबविण्याची गरज

मुंबई - उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर बलात्कार करून करण्यात आलेल्या तिच्या हत्येवरून संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस आणि प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढावो अभियानाच्या अगदी विरोधात कारभार सुरू आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, बेटी बचाओ, बेटी पढावो, या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या अगदी उलट कारभार उत्तर प्रदेशात सुरु आहे. हाथरस येथील घटनेनंतर बलरामपूर येथे सामूहिक बलात्कार व हत्येची आणखी एक घटना उजेडात आली. हे कधी थांबणार आहे? असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. तसेच या अमानुष घटना थांबविण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कठोर कायदे करण्याची व ते राबविण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी मांडले.



उत्तर प्रदेश सरकारचे वागणे अमानवी : हाथरस बलात्कारप्रकरणी जयंत पाटील यांची टीका

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील बलात्कार पीडित तरुणीचा मृतदेह परस्पर जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे हे सरकार अमानवी असल्याचे दिसत आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी ट्विटरद्वारे केली.
त्यांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, कुटुंबियांच्या गैरहजेरीत भारताच्या मुलीवर रात्रीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारचे हे वागणे अमानवी व दुदैवी आहे. मुलींना जीवंतपणी येथे ना सन्मान मिळतो, ना मेल्यानंतर. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वारंवार घेतात. केवळ नाव घेण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा त्यांनी घ्यावी.उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जर न्याय, सन्मान आणि समानतेचे राज्य निर्माण करता येत नसेल तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

योगी आदित्यनाथांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; प्रियंका गांधींची मागणी

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दिल्लीत सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पीडितेचा मृत्यू झाला. यामुळे देशभर संताप व्यक्त होत आहे.
आधी पोलिसांनी दुर्लक्ष केले, त्यानंतर जेव्हा मृत्यू झाला तेव्हा पोलिसांनी हाथरस येथे मध्यरात्री जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले. पोलिसांच्या या भूमिकेवरून विरोधकांनी उत्तर प्रदेशातील सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला आहे.

 

Web Title: Hathras gangrape case : Supriya Sule lashes out at Yogi Sarkar over Hathras gangrape case, says ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.