काँग्रेस अन् मित्रपक्षांची कृती लोकशाहीसाठी लज्जास्पद; गोस्वामींवरील कारवाईवरून अमित शहांचा घणाघात

By कुणाल गवाणकर | Published: November 4, 2020 03:15 PM2020-11-04T15:15:00+5:302020-11-04T15:15:46+5:30

Arnab Goswami Arrested: अमित शहांची महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका

home minister amit shah slams thackeray government over arnab goswami arrest | काँग्रेस अन् मित्रपक्षांची कृती लोकशाहीसाठी लज्जास्पद; गोस्वामींवरील कारवाईवरून अमित शहांचा घणाघात

काँग्रेस अन् मित्रपक्षांची कृती लोकशाहीसाठी लज्जास्पद; गोस्वामींवरील कारवाईवरून अमित शहांचा घणाघात

Next

नवी दिल्ली: रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींना आज सकाळी रायगड पोलिसांनी अटक केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. यानंतर राज्यातल्या भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीदेखील राज्य सरकारच्या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकारची कारवाई आणीबाणीची आठवण करून देणारी असल्याचं शहांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

'काँग्रेसचे आणि त्यांच्या मित्र पक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली. रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात सत्तेचा गैरवापर करून झालेली कारवाई व्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाहीवरीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला आहे. यामुळे मला आणीबाणीची आठवण येते. माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील या हल्ल्याचा निषेध व्हायला हवा आणि तो होईलच,' अशा शब्दांत शहांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.



''गृहमंत्री अमित शहांनी माहिती घेऊन बोलावं''
अमित शहांच्या महाविकास आघाडी सरकारवरील टीकेला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अर्णब गोस्वामींच्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी संबंध काय?, असा थेट सवाल सावंत यांनी विचारला आहे. एका व्यवसायिकेचे पैसे बुडवल्यानं आणि त्या व्यवसायिकानं आत्महत्या केल्यानं गोस्वामींना अटक झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आधी माहिती घ्यावी आणि मग बोलावं, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

"गोस्वामी भाजप कार्यकर्ते आहेत का? मग त्यांच्यासाठी भाजपकडून इतकी आरडाओरड कशासाठी?"

अनिल परब यांच्याकडूनही भाजपचा समाचार
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी अन्वय नाईक नावाच्या एका व्यवसायिकाचे पैसे बुडवले. त्यामुळे नाईक यांनी आर्थिक विंवचनेतून आत्महत्या केली. म्हणून गोस्वामींना अटक झाली आहे, असं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई झाल्यासारखे ओरडताहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

अन्वय नाईक कोण होते?, त्यांची आत्महत्या आणि अर्णब गोस्वामींचं कनेक्शन काय?... वाचा

अर्णब गोस्वामींनी नाईक यांचे पैसे बुडवले. त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक समस्येतून त्यांनी आत्महत्या केली. एका मराठी भगिनीचं कुंकू गोस्वामींमुळे पुसलं गेलं. या प्रकरणाचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी कोणताही संबंध नाही. मग भाजप नेते गोस्वामींच्या अटकेवरून इतका आरडाओरडा कशासाठी करताहेत? गोस्वामी काय भाजपचा कार्यकर्ता आहे का?, असे प्रश्न परब यांनी विचारले आहेत. अन्वय नाईक यांनी गोस्वामी यांच्यामुळे आत्महत्या केली. भाजप नेते अशा गोस्वामींच्या बाजूनं आहेत का? असतील तर तसं त्यांनी जाहीर करावं, असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले.

Web Title: home minister amit shah slams thackeray government over arnab goswami arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.