Karnataka CM: कर्नाटकात गृहमंत्र्यांना मिळाली बढती; बसवराज बोम्मई नवे मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 08:39 PM2021-07-27T20:39:09+5:302021-07-27T20:40:27+5:30
Karnataka new CM Basavaraj Bommai: खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत होती.
Karnataka CM: कर्नाटकमध्येमुख्यमंत्री येडीयुराप्पांच्या (bs yediyurappa) राजीनाम्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. येडीयुराप्पांचा उत्तराधिकारी कोण नेमायचा यावरून भाजपा पेचात सापडली होती. लिंगायत समाजाला दुखवायचे नाही, एवढा संदेश भाजपा नेतृत्वाकडे गेला होता. आज भाजपाने कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. बसवराज बोम्मई (Basavaraj S Bommai) कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. (Karnataka BJP Legislative Party elected Basavaraj S Bommai as Chief Minister of the State)
बोम्मई हे येडीयुराप्पा सरकारमध्ये गृहमंत्री होते. खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत होती. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे यांचेही नाव चर्चेत आले होते. दिल्लीत येडीयुराप्पा यांनी माझ्या मर्जीतला नेताच मुख्यमंत्री करावा अशी अट घातली होती. यानुसार भाजपाने सुवर्णमध्य साधत बोम्मई यांना मुख्यमंत्री पद दिले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आज याची घोषणा केली.
Karnataka BJP Legislative Party elected Basavaraj S Bommai as Chief Minister of the State pic.twitter.com/Arrm4PiHTs
— ANI (@ANI) July 27, 2021
येडीयुराप्पांच्या तीन अटी...
येडीयुराप्पा हे गेल्या आठवड्यात दिल्लीला गेले होते. दोन दिवस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. यानंतर राज्यात येत त्यांनी 26 जुलैरोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. येडींनी दिल्लीच्या नेत्यांसमोर तीन अटी ठेवल्या होत्या. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी होत्या. आता उरलेल्या दोन अटी पूर्ण होतात का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Basavaraj S Bommai to be the next CM of Karnataka announces BJP observer for the state and Union Minister Dharmendra Pradhan pic.twitter.com/poNFhORUHq
— ANI (@ANI) July 27, 2021