भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण?; कोणाला मिळालं कोणतं पद?... वाचा
By प्रविण मरगळे | Published: September 26, 2020 04:51 PM2020-09-26T16:51:50+5:302020-09-26T16:52:38+5:30
भाजपाच्या या यादीत महाराष्ट्रातील ८ जणांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह अनेकांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळणार असल्याची चर्चा होती. आज याबाबत केंद्रीय भाजपाने या नावांची घोषणा केली आहे.
भाजपाच्या या यादीत महाराष्ट्रातील ८ जणांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने विनोद तावडे, पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. केंद्रीय पातळीवरील या यादीत महाराष्ट्रातल्या खालील नेत्यांना स्थान दिलं आहे.
वी. सतीश – राष्ट्रीय सहसरचिटणीस
विनोद तावडे – राष्ट्रीय सचिव
सुनील देवधर - राष्ट्रीय सचिव
पंकजा मुंडे – राष्ट्रीय सचिव
विजया राहटकर – राष्ट्रीय सचिव
जमाल सिद्धिकी – राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष
संजू वर्मा – राष्ट्रीय प्रवक्ते
खासदार हिना गावित – राष्ट्रीय प्रवक्ते
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने भाजपा केंद्रीय पदाधिकारियों के नामों की घोषणा की। pic.twitter.com/oLGRoSmbPa
— BJP (@BJP4India) September 26, 2020
या महाराष्ट्रातील नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. विनोद तावडे यांना विधानसभेची उमेदवारी दिली नव्हती, त्यांच्याऐवजी बोरिवलीतून सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली, पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाचं कोणतंही पद नव्हतं, पक्षाच्या जाहीर कार्यक्रमातही पंकजा मुंडे यांचा सक्रीय सहभाग नव्हता. त्यामुळे पंकजा नाराज असल्याचंही बोललं गेले, त्यामुळे पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवर पद देऊन त्यांना खूश करण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाकडून झाला आहे. मात्र या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने अद्याप कोणतीही संधी दिली नसल्याचं दिसून येते.