शेकडो आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांनी काढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 04:19 AM2019-04-18T04:19:15+5:302019-04-18T04:19:32+5:30
फेसबूक, टि्वटर, व्हॉट्सअॅप या समाजमाध्यमांनी निवडणूक आयोगाच्या आदेशावरून गेल्या काही दिवसांत काढून टाकल्या आहेत किंवा भारतापुरती ‘ब्लॉक’ केल्या आहेत.
नवी दिल्ली : निवडणूक आचारसंहितेचा भंग करणाऱ्या सुमारे ५०० आक्षेपार्ह पोस्ट, जाहिराती अथवा अकाऊंट फेसबूक, टि्वटर, व्हॉट्सअॅप या समाजमाध्यमांनी निवडणूक आयोगाच्या आदेशावरून गेल्या काही दिवसांत काढून टाकल्या आहेत किंवा भारतापुरती ‘ब्लॉक’ केल्या आहेत.
निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकट्या फेसबूकवरून ४६८ पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत. हटविलेल्या सर्वाधिक पोस्ट तेलंगणातून टाकलेली होती.
‘काँग्रेस, सप व बसपला अली प्रिय असेल तर आम्हाला बजरंग बली प्रिय आहे’, या योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यांचे टिष्ट्वटही काढून टाकले आहे. याच वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना तीन दिवसांची प्रचारबंदी केली आहे.