"प्रताप सरनाईकांनी माझ्याविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करावाच", सोमय्यांचं खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 11:17 AM2020-12-19T11:17:48+5:302020-12-19T11:20:29+5:30
BJP Kirit Somaiya And Shivsena Pratap Sarnaik : किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांना एक खुलं आव्हान दिलं आहे.
मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पार्टनर मोहित अग्रवाल यांचा एनएसईएलचा २५० कोटी रुपयांचा घोटाळा यापूर्वी बाहेर आला होता. त्या पैशांतून त्यांनी कल्याण तालुक्यातील गुरुवली येथे ७८ एकर जमीन खरेदीचे व्यवहार केले आहेत. त्यांवर ईडीची जप्ती आली असताना हे व्यवहार पुढे सुरूच आहेत, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले होते. यानंतर आता किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांना एक खुलं आव्हान दिलं आहे.
"प्रताप सरनाईकांनी माझ्याविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करावाच" असं म्हणत सोमय्यांनी आव्हान दिलं आहे. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "शिवसेना प्रताप सरनाईकांनी माझ्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करावाच. त्यांचा भ्रष्टाचार, घोटाळे उघड करण्याचा आमचा लढा सुरूच राहील" असं म्हटलं आहे. तसेच "एक रुपयांचाही दावा ते माझ्याविरोधात दाखल करू शकत नाहीत. सरनाईक यांनी आधी जनतेच्या फसवणुकीचा जाब द्यावा" असं देखील याआधी म्हटलं आहे.
I challenge Shivsena Pratap Sarnaik to file Defamation suit of ₹100 Crore against Me. Our fight to expose His Scams will continue.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 19, 2020
शिवसेना प्रताप सरनाईकनी माझ्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करावाच. त्यांचा भ्रष्टाचार, घोटाळे उघड करण्याचा आमचा लढा सुरूच राहील pic.twitter.com/ZCpgNLlYbG
किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. आम्ही ठाण्यात कोणत्याही प्रकारची अनाधिकृत इमारत बांधलेली नाही. विहंग गार्डन या इमारतींची तक्रार केलेली चुकीची असून मी या शहराचा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करतांना, अनाधिकृतरित्या केलेले नाही आणि करणार ही नाही. असे सांगतांनाच किरीट सोमय्या यांनी जे काही बदनामी केलेली आहे, त्याच्याविरोधात आता थेट न्यायालयात १०० कोटींचा अब्रु नुकसानाची दावा ठोकणार असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विहंग गार्डनच्या बाबतीत 'खोदा पहाड निकला चुहा' अशी म्हणण्याची वेळ आता सोमय्या यांच्यावर आल्याची टीकाही त्यांनी केली.
किरीट सोमय्या यांच्याविरोधात प्रताप सरनाईक ठोकणार १०० कोटींचा अब्रु नुकसानाची दावा
किरीट सोमय्या सारख्या नेत्यांनी देखील अशीच कृत्ये मागील काही दिवसापासून केले आहे, मी प्रत्येक शंकेचे निरसरण ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर केलेले आहे. अजूनही काही शंका असतील तरी १०० वेळा येण्यास मी तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच चौकशीला सहकार्य करेल असेही स्पष्ट केले आहे. परंतु १० वर्षापूर्वीचे प्रकरण पुढे आणून माझी बदनामी करण्याचे काम ठाण्यातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आणि किरीट सोमय्या यांनी सुरू केले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी जी काही बदनामी केलेली आहे. त्याच्या विरोधात मी १०० कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
"वैयक्तिक अहंकारातून विकास प्रकल्पांचा गळा घोटला, हे विरोधक नव्हे तर विकासातील गतिरोधक", आशिष शेलारांनी ठाकरे सरकारला लगावला सणसणीत टोलाhttps://t.co/HqQ991hRiS#BJP#AshishShelar#ThackerayGovernment#Maharashtrapic.twitter.com/XUZNIp2Hge
— Lokmat (@MiLOKMAT) December 18, 2020