"शिवसेना, अकाली दल नसलेल्या आघाडीला मी एनडीए मानत नाही," संजय राऊतांचा भाजपाला टोला
By बाळकृष्ण परब | Published: September 27, 2020 02:08 PM2020-09-27T14:08:17+5:302020-09-27T14:12:44+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपाचा सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाने भाजपाशी उभा दावा मांडत एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान, अकाली दलाने एनडीए सोडल्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहेत.
मुंबई - महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडत महाविकास आघाडीत प्रवेश केले होता. तर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपाचा सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाने भाजपाशी उभा दावा मांडत एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान, अकाली दलाने एनडीए सोडल्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहेत.
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना आणि अकाली दल हे एनडीएचे दोन मजबूत स्तंभ होते. काही दिवसांपूर्वी शिवसेनेला नाईलाजास्तव एनडीएमधून बाहेर पडावे लागले. आता अकाली दलानेही एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. तर एनडीएत भाजपाला आता नवे मित्र मिळाले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. मात्र ज्या आघाडीमध्ये शिवसेना आणि अकाली दल नाहीत, अशा आघाडीला मी एनडीए मानत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीबाबतसुद्धा भाष्य केले. ते म्हणाले की, आमच्या भेटीमध्ये गोपनीय असे काही नव्हते. गोपनीय भेट म्हणायला आम्ही काही बंकरमध्ये तर भेटलेलो नाही. या भेटीत सामनातील मुलाखतीबाबत चर्चा झाली. बाकी गोपनीय म्हणायचं तर आम्ही गोपनीय पद्धतीनं भोजन केलं, असा चिमटा राऊत यांनी काढला.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना न भेटालयला आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक वाद होतात पण वैयक्तिक वाद होत नाही. सत्ताधारी विरोधक भेटतच असतात. भाजपासोबत सत्तेत असताना मी शरद पवार यांना भेटायचो. आजही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले नेते मानतो, असे संजय राऊत म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...
आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी