'त्यांच्या'मुळेच मला बैठकीला बोलावले नाही; पण कुणाविषयी गाऱ्हाणे मांडण्याइतका मी लेचापेचा नाही..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 06:53 PM2020-10-27T18:53:04+5:302020-10-27T19:11:56+5:30
'त्यांच्या'मुळेच मला बैठकीला उपस्थित राहू दिले गेले नव्हते, असा अप्रत्यक्ष आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी बैठकीपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर केला होता..
पुणे : शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या सर्व बैठकांना मला आमंत्रित करण्यात येत होते. तसेच माझ्यासह अनेकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी कधीही कुणावर अन्याय देखील केला नाही. पण आज बैठकीला न बोलावले गेल्याने मला आंदोलन करावे लागले. 'त्यांच्या'मुळेच मला बैठकीला उपस्थित राहू दिले गेले नव्हते, असा अप्रत्यक्ष आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी बैठकीपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर केला होता. बैठक संपल्यावर परत एकदा धस यांनी ''कुणाविषयी गाऱ्हाणे मांडण्याइतका मी लेचापेचा नाही'' अशा शब्दात धनंजय मुंडे यांना जोरदार टोला लगावला आहे.
मांजरी येथील वसंत शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मंत्री जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री दिलीप वळसे पाटील,पंकजा मुंडे, भाजपचे नेते सुरेश धस यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते.
पण या बैठकीच्या केवळ काही तास आधी नेते सुरेश धस यांना फोनवरून ऊसतोडणी कामगारांच्या बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचा निरोप कळवण्यात आला. त्यानंतर धस यांनी आक्रमक पवित्रा धारण आपल्या कार्यकर्त्यांसह शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रवेशद्वारावरच जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन सुरु केले. त्यामुळे काही काळ परिसरात चांगलाच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पण थोड्याच वेळात आतमधून धस यांना बैठकीला आमंत्रित करण्यात आले. यानंतर आंदोलन मागे घेत ते बैठकीला हजर झाले. त्यामध्ये ऊसतोड मजुराच्या समस्या मांडल्या आहे. तसेच उसतोड कामगारांच्या वेतनात ८५ टक्क्यांनी वाढ झाली पाहिजे आहि आग्रही भूमिका देखील मांडली.
धस म्हणाले, ऊसतोडणी कामगारांची आजची बैठक निश्चित सकारात्मक स्वरूपाची झाली असून शरद पवार यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी आमचा संप दोन महिन्यांसाठी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दोन महिन्यांनंतर काही ठोस निर्णय घेतला गेला नाही तर आम्ही उसाच्या फडात जाऊन आंदोलन करणार आहोत. धनंजय मुंडे यांच्यामुळे बैठकीला उपस्थित राहू दिले गेले नव्हते याबात काही बोलणे झाले का ? यावर त्यांनी धनंजय मुंडे यान पुन्हा एकदा जोरदार टोला लगावत कुणाविषयी गार्हाणे मांडण्याइतका मी लेचापेचा व आंडूपांडू नाही, असेही स्पष्ट केले.
मी काही गार्हाणं मांडण्याइतपत लेचापेचा आणि आंडूपांडू नाही. अशी भूमिका भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी मांडत पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर यांच्यावर निशाणा साधला. उसतोड मजुराच्या प्रश्नावर बैठकीसाठी बोलविले नव्हते. त्यावरुन धनंजय मुंडे यांच्यावर बैठकीपूर्वी धस यांनी निशाणा साधला होता. त्यावर बैठकीत काही चर्चा झाली का? त्या प्रश्नावर सुरेश धस यांनी भूमिका मांडली.
पुण्यात उसतोड मजुराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंत दादाशुगर इन्स्टिट्युटमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे नेते सुरेश धस यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते. या बैठकीतून बाहेर पडताच, सुरेश धस यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला.
यावेळी सुरेश धस म्हणाले की, उसतोड मजुराच्या प्रश्नावर आज पुण्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तसेच शरद पवार साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांनी आजवर झालेल्या बैठकीत बोलवले आहे. समस्या समजून घेतले असून कधीही अन्याय केला नाही. मात्र आज बैठकी पूर्वी बोलवले नसल्याने मला आंदोलन करावे लागले. त्यानंतर अखेर बैठकीला बोलविण्यात आले. त्यामध्ये उस तोड मजुराच्या समस्या मांडल्या आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचे झाल्यास, उसतोड कामगारांच्या वेतनात ८५ टक्क्यांनी वाढ झाली पाहिजे.
यासह अनेक मुद्दे मांडले आहेत. या बैठकीत चांगली चर्चा झाली असून शरद पवार यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी आमचा संप दोन महिन्यांसाठी मागे घेत आहोत. जर दोन महिन्यांनंतर निर्णय झाला नाही. तर आम्ही उसाच्या फडात जाऊन आंदोलन करू, इशारा देखील त्यांनी दिला. धनंजय मुंडे यांच्यामुळे बैठकीत येऊ दिले नसल्याचा अप्रत्यक्षपणे भूमिका धस यांनी मांडली होती. त्या बाबत चर्चा बैठकीत झाली का त्यावर ते म्हणाले की, मी काही गार्हाणं मांडण्या इतपत लेचापेचा नसल्याची भूमिका मांडत पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.