कंगना राणौत जर ड्रग्स घेत असेल तर तिचीही चौकशी करावी: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

By प्रविण मरगळे | Published: September 23, 2020 07:04 PM2020-09-23T19:04:28+5:302020-09-23T19:05:52+5:30

ती भारताची नागरिक आहे, कायदा सगळ्यांनाच समान असायला हवा, याबाबत कोणालाही आक्षेप नाही असं स्पष्ट मत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे.

If Kangana Ranaut is taking drugs, should also be investigated: Opposition Leader Pravin Darekar | कंगना राणौत जर ड्रग्स घेत असेल तर तिचीही चौकशी करावी: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

कंगना राणौत जर ड्रग्स घेत असेल तर तिचीही चौकशी करावी: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

googlenewsNext
ठळक मुद्देड्रग्सचा विळखा फक्त बॉलिवूड नव्हे तर देशभरातून संपायला हवासिनेसृष्टीत येणारे नवोदित कलाकार ड्रग्सच्या आहारी जात असल्याचं ते योग्य नाहीकायदा सगळ्यांनाच समान असायला हवा, याबाबत कोणालाही आक्षेप नाही

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर आता बॉलिवूड आणि ड्रग्स यांचे कनेक्शन चौकशीतून उघड होत आहे. ड्रग्सच्या विळख्यात अनेक बॉलिवूड कलाकारांची नाव एनसीबीच्या चौकशीत समोर येत आहे. सारा अली खान, दीपिका पादुकोण अशा सेलेब्रिंटींची नावे समोर आली आहेत. यातच कंगना राणौत जर ड्रग्स घेत असेल तर तिचीही चौकशी करावी असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले आहे.

याबाबत प्रविण दरेकर म्हणाले की, सिनेसृष्टीत येणारे नवोदित कलाकार ड्रग्सच्या आहारी जात असल्याचं ते योग्य नाही, कंगना बोलतेय म्हणून नव्हे तर ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्यांन बाहेर काढायला हवं, कोणीही त्यांना पाठिशी घालू नये, कंगना राणौत जर ड्रग्स घेत असेल तर तिचीही चौकशी व्हायला हवी, त्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही असं त्यानी सांगितले.

तसेच कंगनाने हा विषय समोर आणला पण ड्रग्सचा विळखा फक्त बॉलिवूड नव्हे तर देशभरातून संपायला हवा, कंगना राणौतचा कोणता व्हिडीओ असेल त्यात ती ड्रग्स एडिक्ट आहे असं म्हणतेय, तर त्याची पडताळणी करुन तिची चौकशी व्हावी, ती भारताची नागरिक आहे, कायदा सगळ्यांनाच समान असायला हवा, याबाबत कोणालाही आक्षेप नाही असं स्पष्ट मत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे.

सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती ड्रग्स मागवत असल्याची माहिती समोर आली. यानंतर एनसीबीच्या तपासात बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांची नावं समोर आली. ड्रग्स प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांची नावं पुढे आली होती. या सर्व अभिनेत्रींना आज एनसीबीनं समन्स पाठवलं.

सारा अली खानदेखील सध्या गोव्यातच आहे. साराची आई अमृता सिंहचं घर गोव्यात आहे. सारा सध्या आईच्या घरी आहे. रिया चक्रवर्तीनं चौकशीदरम्यान सर्वप्रथम साराचं नाव घेतलं होतं. समन्स बजावण्यात आलेल्या अभिनेत्रींविरोधात ठोस पुरावे असल्याची माहिती एनसीबीनं दिली. या प्रकरणी एनसीबीनं रियासह अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. अभिनेत्रींविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांचीही चौकशी केली.

एनसीबीच्या चौकशीचा सामना करावा लागू  शकते. 

एनसीबीच्या या तपासात दीपिका पादुकोणचे जया साहाच्या मॅनेजर करिश्मा सोबत झालेल्या चॅट्स समोर आल्या आहेत. जया साहा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचे चॅटदेखील समोर आले आहेत.यात श्रद्धा जयाकडून सीबीडी ऑयल मागत होती. चौकशीत चॅटमध्ये काही इंग्रजी अक्षरे कोड म्हणून वापरली जात असल्याचे निष्पन्न झाले. कोड्सनुसार DNSK (D म्हणजे दीपिका पादुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि करिश्मा प्रकाश) आहे.

बॉलिवूड अभिनेत्रींची ड्रग्स प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रविना टंडनने ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे. यात ती म्हणते, 'आता सफाईची वेळ आली आहे. स्वागत आहे! आपल्या येणाऱ्या पिढ्यांची मदत होईल. इथून सुरूवात करा त्यानंतर दुसऱ्या क्षेत्राकडे वळा. मुळापासून उखडून फेका. दोषी, यूजर्स, डीलर्स, सप्लायर्सना शिक्षा द्या. फायदा घेणारे मोठे लोक निशाण्यावर आहेत. जे दुसऱ्यांकडे बघतही नाही आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त करतात'. रविनाची ही पोस्ट ना कुणाच्या समर्थनात आहे ना कुणाच्या विरोधात आहे. तिने न्यूट्रल राहून समोर येत असलेल्या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलंय.  

Web Title: If Kangana Ranaut is taking drugs, should also be investigated: Opposition Leader Pravin Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.