मोदींनी सांगितले तर वाघाशीही दोस्ती करू - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 07:51 AM2021-06-10T07:51:09+5:302021-06-10T07:52:16+5:30
Chandrakant Patil : एका कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले की, “आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती.” उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट घेतली आणि राजकीय चर्चांना जोर आला.
या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले की, “आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती.” उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. तसेच फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. का ते माहीत नाही. पण इकडे जर वाघाशी दोस्ती असती तर अठरा महिन्यांपूर्वीच सरकार आले असते. मात्र मोदींनी सांगितले तर त्यांचा आदेश आमच्यासाठी आज्ञा आहे. नेत्याचा आदेश म्हटल्यावर आम्ही वाट्टेल ते करू. पण तसे काही जरी घडले तरी निवडणुका या स्वतंत्रपणेच लढविणार."