"ते जर शेतकरी नसतील तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करतंय?"; चिदंबरम यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 11:28 AM2020-12-14T11:28:58+5:302020-12-14T11:30:30+5:30

P Chidambaram And Farmers Protest : आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा करणाऱ्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी एक सवाल केला आहे.

if there are no farmers among thousands of protesters why government talking them ask chidambaram | "ते जर शेतकरी नसतील तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करतंय?"; चिदंबरम यांचा सवाल

"ते जर शेतकरी नसतील तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करतंय?"; चिदंबरम यांचा सवाल

Next

नवी दिल्ली - केंद्राने केलले तीनही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम असून 14 डिसेंबरपासून आंदोलन आणखी तीव्र केलं जात आहे. शेतकरी संघटनांचे नेते सामूहिक उपोषण करणार असून, देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान काही नेत्यांनी शेतकऱ्यांमध्ये काही नक्षलवादी असल्याचाआरोप केला तर काहींनी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला. असे आरोप करणाऱ्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी एक सवाल केला आहे.

"सत्ताधारी मंत्र्यांनी शेती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना खलिस्तानी, पाकिस्तान आणि चीनचे एजंट, नक्षलवादी म्हटलं आहे. हल्ली तर त्यांचा उल्लेख हे मंत्री तुकडे तुकडे गँगमधील सदस्य असाही करताना दिसत आहेत. जर तुम्ही असे आरोप करत आहात तर याचा अर्थ या हजारो आंदोलनकर्त्यांमध्ये एकही शेतकरी नाही. जर या आंदोलनात एकही शेतकरी नाही, तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करत आहे?" असा कोंडीत पकडणारा प्रश्न पी चिदंबरम यांनी सत्ताधारी नेत्यांना विचारला आहे.

पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पंजाबचे उपमहानिरीक्षक (तुरुंग) लखमिंदरसिंग जाखड यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात जाखड यांनी  शेतकऱ्यांना समर्थन म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. जयपूरहून दिल्लीकडे जाणारा अखेरचा राष्ट्रीय महामार्ग शहाजहाँपूर येथे रविवारी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली राजस्थान, हरयाणा आणि पंजाबच्या हजारो शेतकऱ्यांनी बंद करून टाकला. इतर चार महामार्ग यापूर्वीच बंद केले गेले आहेत. 

"शेतकरी आंदोलनामागे चीन-पाकिस्तानचा हात, देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा डाव"

काही दिवसांपूर्वी  हरियाणाचे कृषीमंत्री जे. पी. दलाल यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला होता. देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा हा डाव आहे असं देखील दलाल यांनी म्हटलं होतं. "शेतकऱ्यांना पुढे करुन चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांचा भारतात अस्वस्थता पसरवण्याचा डाव आहे. मात्र मोदी काही कमजोर नेते नाहीत. त्यांना आता जनतेचे समर्थन मिळालेलं आहे. कृषी कायदे लागू केल्यानंतरही जनतेनं त्यांना मोठा पाठिंबा दिला होता. शेतकरी रस्त्यावर आले तर यासंदर्भातील निर्णय संसदेत घ्यायचा की रस्त्यावर?" असा सवाल देखील जे. पी. दलाल यांनी उपस्थित केला होता. 

Web Title: if there are no farmers among thousands of protesters why government talking them ask chidambaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.