'वरुण सरदेसाई परत आला तर माघारी जाणार नाही', नारायण राणेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 02:14 PM2021-08-27T14:14:28+5:302021-08-27T14:15:55+5:30
Narayan Rane slams Varun sardesai: 'आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक होत नाही, कारण तो नातलग आहे.'
रत्नागिरी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांकडून अटक झाली होती. या अटकेदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी राणेंविरोधात निदर्शनं झाली. या मुंबईतील राणेंच्या घराबाहेर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी तीव्र आंदोलनं केलं होतं. त्यावर आता नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आपल्याच वहिनीवर ऍसिड फेकायला कुणी सांगितलं होतं..? नाव न घेता राणेंचा गंभीर आरोप
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अटक नाट्यादरम्यान नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रेत खंड पडला होता. पण, आज रत्नागिरीतून राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली. यावेळी माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत आला तर माघारी जाणार नाही, असा थेट इशारा राणेंनी दिला.
जन आशिर्वाद यात्रेच्या कोकण दौऱ्यादरम्यान रत्नागिरी येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. #JanAshirwadYatrapic.twitter.com/g5WvZ429Eg
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 27, 2021
राणे पुढे म्हणाले की, आमच्या घरावर हल्ला करणारा मुख्यमंत्र्यांचा नातलग आहे, त्यामुळे त्याला अटक होत नाही. तो काय आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट ? कुठल्याही नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तेव्हढा त्याला दिला आहे, असे राणे म्हणाले. तसेच, वरुण सरदेसाइनं आंदोलनादरम्यान चांगलाच मार खाल्ला. एवढे पोलीस असून तिथल्या आमच्या मुलांनी एव्हढा चोपला ना त्याला...आता परत आला तर परत नाही जाणार, असा इशाराच नारायण राणेंनी दिला.