अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 09:48 AM2020-12-04T09:48:54+5:302020-12-04T09:50:54+5:30

Amravati teacher Constituency: महाआघाडीचे देशपांडे, अपक्ष भोयर यांच्याशी लढत, भाजप उमेदवार पिछाडीवर

Independent kiran Sarnaik leads in Amravati teachers constituency | अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर

Next

अमरावती : विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी गुरुवारी सुरू असलेल्या मतमोजणीच्या दुसऱ्या पसंतीच्या अकराव्या फेरीअंती रात्री उशिरापर्यंत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी ६,११४ मते मिळवित आघाडी घेतली. दुसऱ्या क्रमांकावर महाआघाडीचे उमेदवार व मावळते आमदार श्रीकांत देशपांडे यांना ५,१६० मते मिळाली. अपक्ष उमेदवार शेखर भोयर ४,९३१ मते घेत तिसऱ्या स्थानी आहेत.भाजपचे नितीन धांडे आश्चर्यकारकरित्या माघारले.

पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर रात्री उशिरा १४,९१६ मतांचा कोटा विजयासाठी निश्चित करण्यात आला. दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी रात्री नऊनंतर मतमोजणीला सुरुवात होऊन सर्वात कमी मते असणारे उमेदवार विनोद मेश्राम, अनिल काळे, अभिजित देशमुख, दिपंकर तेलगोटे, प्रवीण विधळे, मुस्तकाल शहा, श्रीकृष्ण ठाकरे, महम्मद कुरेशी, उपेंद्र पाटील, आलम तनवीर, शरदचंद्र हिंगे यांना प्रक्रियेतून बाद करण्यात आले. विजयी मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी ही प्रक्रिया निरंतर चालणार आहे. या निवडणुकीत एकूण मतदान ३०,९१८ इतके असून त्यापैकी १०९८ मते अवैध ठरली. २९,८२९ मते वैध ठरली आहेत. या निवडणुकीत एकूण २७ उमेदवार रिंगणात होते. निकाल जाहीर व्हायला पहाट उजाडू शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे, नागपूर महाविकास आघाडीने  जिंकले

सहापैकी चार पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचे निकाल लागले असून काँग्रेस, राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळाला आहे. तर एका जागेवर निकालाची प्रतिक्षा आहे. विरोधी पक्ष ठरलेल्या भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपाचे अमरीश पटेल जिंकले आहेत. तर औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड विजयी झाले आहेत.  पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर असून अद्याप निकाल लागायचा आहे. दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर नागपूर नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसच्या ॲड. अभिजित वंजारी यांनी दणदणीत विजय मिळविल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. 

Web Title: Independent kiran Sarnaik leads in Amravati teachers constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.