इंदिरा गांधींनाही RSSनं पाठिंबा दिला होता, मग मी दिला तर काय झालं ?- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 08:29 PM2019-04-06T20:29:06+5:302019-04-06T20:29:28+5:30
गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरेंनी आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली आहे.
मुंबईः गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरेंनी आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज देशावर नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं संकट आलेलं आहे, ते दूर करण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत राहणार आहे. इथे तेलुगू देसम किंवा इतर पक्ष नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच हे पक्ष आहेत. माझ्या प्रचाराचा फायदा त्यांना होत असेल, तर मी काय करू, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष निवडून येऊ नयेत, म्हणून मी बोलणार आहे.
इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशची निर्मिती केल्यानंतरही आरएसएसनं त्यांना पाठिंबा दिला होता, आरएसएसनं काँग्रेसला पाठिंबा दिला होता. भाजपाच्या लोकांना एकदा विचारा, 75ला आणीबाणी आणली गेली, 77 निवडणुका झाल्या, त्यावेळी निवडणुकीत उभा असलेल्या जनता पक्षाला मतदान करणारे असंख्य काँग्रेसवाले होते. राजीव गांधींची, इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळी अनेकांनी काँग्रेसला मतदान केलं. देश संकटात आल्यास वेगळा विचार करणं गरजेचं असतं.