"शरद पवारांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक पक्षात येण्यासाठी इच्छुक"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 04:12 PM2021-07-09T16:12:23+5:302021-07-09T16:13:42+5:30

Jayant Patil : पक्ष वाढविणे सोपे असते पण पक्षात आलेल्यांना योग्य सन्मान देणं ही मोठी जबाबदारी असते. पक्षात आलेल्यांना हा सन्मान नक्कीच दिला जाईल, असा जयंत पाटील म्हणाले.

Inspired by Sharad Pawar's ideology, many people want to join the party - Jayant Patil | "शरद पवारांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक पक्षात येण्यासाठी इच्छुक"

"शरद पवारांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक पक्षात येण्यासाठी इच्छुक"

Next

मुंबई : लोकांमधील कार्यकर्ते जेव्हा आपल्या पक्षात प्रवेश करतात तेव्हा आम्हाला मनापासून आनंद होतो. लातूर जिल्ह्याकडून राजकीय संस्कृती कशी सांभाळावी हे आम्ही शिकलो आहोत. त्यामुळे या जिल्ह्याकडे आमचा विशेष ओढा आहे. निलंगा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद थोडी कमी पडत होती. ही ताकद वाढविण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचे आहे. पंडितराव धुमाळ यांच्या येण्याने या ताकदीत भर पडली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी मांडले. 

लातूर जिल्ह्यातील भाजपा आणि काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी गुरूवारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. यासोबतच जनमानसाचा ओढा राष्ट्रवादीकडे आहे. पक्ष वाढविणे सोपे असते पण पक्षात आलेल्यांना योग्य सन्मान देणं ही मोठी जबाबदारी असते. पक्षात आलेल्यांना हा सन्मान नक्कीच दिला जाईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी दिला.  

दरम्यान, संजय बनसोडे यांनीही पक्षप्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले. निलंगा मतदारसंघात पक्ष संघटना बळकट करण्याची व येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळवून देण्याची जबाबदारी आता पंडितराव धुमाळ यांच्यावर आहे. यासाठी बूथ कमिटी रचनेवर लक्ष दिले तर हे यश नक्कीच आपले आहे, असे संजय बनसोडे यांनी सांगितले. 

लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ, माजी सदस्य प्रविण सुरवसे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अतुल पाटील, निलंगा येथील रहेमानिया तालीम संस्थेचे अध्यक्ष फारुख देशमुख, शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचे सदस्य अनिलकुमार देवंग्रे, देवणीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष वैभव म्हेत्रे, वंचितचे बालाजी लवे, सचिन दोडके, युसुफ सय्यद, गुणवंतराव जाधव, संजय सावकार, बालाजीराव पाटील, सुधीर धुमाळ, विशाल धुमाळ आदींनी जाहीर प्रवेश केला.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष व आमदार बाबासाहेब पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष डी. एन शेळके आदी उपस्थित होते.

Web Title: Inspired by Sharad Pawar's ideology, many people want to join the party - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.