"हे परिवहनमंत्री आहेत की परिवारमंत्री?" अनिल परब यांच्यावर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 02:46 PM2021-03-06T14:46:12+5:302021-03-06T14:50:25+5:30
Maharashtra Politics News : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाची कोंडी केली.
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाची कोंडी केली. दरम्यान, काल विधानसभेत झालेल्या चर्चेत भाजपा आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार टीका केली. यावेळी नीतेश राणे (Nitesh ) यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (It is the Transport Minister or the Family Minister, Nitesh Rane Criticize Anil Parab)
सभागृहात राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना नीतेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, अध्यक्ष महोदय, राज्याला एक परिवहनमंत्री द्या, राज्याला परिवहन मंत्री नाही. आहेत ते परिवार मंत्री बनले आहेत. ते कलानगरच्या अवतीभवती घुटमळत असतात. त्यांनी कलानगरच्या बाहेर पडावे, मंत्रालय आहे, एसटी कामगार आहेत, त्यांचा पगार आहे, त्यात लक्ष घाला, असा सल्ला राणेंनी दिला.
My speech today in Vidhan Sabha https://t.co/pGdvWHVNAz
— nitesh rane (@NiteshNRane) March 5, 2021
अर्थसंकल्पातून जास्त अपेक्षा ठेवू नये, असं सरकार सांगतंय. राज्यासमोर आर्थिक संकट आहे असं सरकार सांगतंय. पण हे आर्थिक संकट केवळ शेतकरी आणि कामगारांसांठीच आहे का. पण सरकारमध्ये बसलेले लोक राजरोसपणे लूट करताहेत. भ्रष्टाचार करताहेत. त्याबाबतही विचार झाला पाहिजे. कारण हे आर्थिक संकट केवळ सामान्य लोकांसाठी आहे. सरकारकडून राजरोसपणे भ्रष्टाचार सुरू आहे. त्याबाबत कुणी बोलत नाही. सरदेसाईंसारख्या व्यक्तींना सरकार का पाठिंबा देतंय. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत राजरोजपणे का फिरतात. ते कंत्राटदारांना फोन का करतात. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा का दिली जातेय, असा सवालही नीतेश राणे यावेळी उपस्थित केला.