Jalgaon Mayor Election : "सत्तेचा वापर अन् आमिष दाखवून मिळवलेला विजय", शिवसेनेच्या विजयावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 05:40 PM2021-03-18T17:40:36+5:302021-03-18T17:53:59+5:30

Jalgaon Mayor Election : जळगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला पराभवाचा धक्का देत शिवसेनेने भगवा फडकावला आहे.

Jalgaon Mayor Election: "Victory achieved by using power and lure", BJP leader's reaction to Shiv Sena's victory | Jalgaon Mayor Election : "सत्तेचा वापर अन् आमिष दाखवून मिळवलेला विजय", शिवसेनेच्या विजयावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

Jalgaon Mayor Election : "सत्तेचा वापर अन् आमिष दाखवून मिळवलेला विजय", शिवसेनेच्या विजयावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

Next
ठळक मुद्देजळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. जयश्री महाजन यांना 45 मतं पडली आहेत. तर भाजपाच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना 30 मतं पडली आहेत.

मुंबई : जळगाव महापालिकेमध्ये (Jalgaon Municipal Corporation) शिवसेनेनं (Shivsena) जोरदार सर्जिकल स्ट्राईक करत भाजपच्या (BJP) गडाला भगदाड पाडले आहे. जळगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला पराभवाचा धक्का देत शिवसेनेने भगवा फडकावला आहे. हा पराभव भाजपासोबतच जळगावमध्ये ज्यांचे प्रस्थ मानले जाते, ते भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे मोठे अपयश म्हटले जात आहे. यावर भाजपाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Jalgaon Mayor Election: "Victory achieved by using power and lure", BJP leader's Pravin Darekar reaction to Shiv Sena's victory)

"सत्तेचा वापर आणि आमिष दाखवून मिळवलेला हा विजय आहे. गिरीश महाजन यांना कोंडित पकडण्याच्या दृष्टीने एकनाथ खडसे पक्ष सोडून गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व पक्षांनी एकत्र येऊन झालेला हा महापौर आहे. हा तात्कालिक विजय आहे. याचे दिर्घकालील काही फायदे होतील, असे मला अजिबात वाटत नाही. दोन दिवसांसाठी गिरीश  महाजन यांना धक्का दिला, अशाप्रकारे बातम्यांपलीकडे यातून त्या-त्या पक्षांना काय फायदा होईल, असे मला वाटत नाही. कारण जे नगरसेवक निवडणून आलेत. ते जळगावमधअये भाजपाच्या विचारधारेवर आलेत आहेत", असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. जयश्री महाजन यांना 45 मतं पडली आहेत. तर भाजपाच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना 30 मतं पडली आहेत. अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होण्याची शक्यता आहे. महापौर निवडणुकीच्या अगोदरच सत्ताधारी भाजपामधील काही नाराज नगरसेवक गळाला लागल्याने महापौर शिवसेनेचाच होणार असा दावा करण्यात येत होता. 

(केवळ १० दिवसांत हे सगळं झालं; एकनाथ खडसेंनी सांगितल्या 'आतल्या' घडामोडी)

Web Title: Jalgaon Mayor Election: "Victory achieved by using power and lure", BJP leader's reaction to Shiv Sena's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.